राहुरी ः वेबटीम शेतकर्यांसाठी जिव्हाळाचा विषय बनलेल्या मुळा धरण पाणलोटात पावसाने जोर धरल्याने आवक वाढल्याचे चित्र आहे. काल सायंकाळी...
राहुरी ः वेबटीम
शेतकर्यांसाठी जिव्हाळाचा विषय बनलेल्या मुळा धरण पाणलोटात पावसाने जोर धरल्याने आवक वाढल्याचे चित्र आहे. काल सायंकाळी 6 वाजता धरणाच्या दिशेने 3212 क्युसेकने पाणी झेपावले होते. त्यामुळे धरणाने आता 8 हजार दलघफू पाणीसाठ्याचा टप्पा ओलांडला आहे.
मुळा धरणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. या धरणावर राहुरीसह नेवास, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र अवलंबून असते. तसेच राहुरी, देवळाली नगरपालिकांसह विविध पाणी योजनाही याच धरणाच्या पाण्यातून जनतेची तहान भागवत असतात. त्यामुळे मुळा धरण भरावे, यासाठी शेतकरी मोठ्या अपेक्षेने देवाजवळ प्रार्थना करत असतो. यंदा आवक अजुनही अपेक्षीत वाढलेली नसली तरी सोमवारी सुरू असलेली 1300 क्युसेकची आवक काल मंगळवारी वाढली होती. ती 3200 क्युसेकने सुरू होती. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा उंचावल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत