श्रीरामपूरात आज कोरोनाचे चार रुग्ण ; संगमनेरात कोरोनाचा 12 वा बळी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूरात आज कोरोनाचे चार रुग्ण ; संगमनेरात कोरोनाचा 12 वा बळी

श्रीरामपूर… ः वेबटीम  शहरात आज पुन्हा कोरोनाचे नवे चार रुग्ण सापडले आहेत तर संगमनेरात कोरोनाचा 12 वा बळी गेल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाल...

श्रीरामपूर… ः वेबटीम
 शहरात आज पुन्हा कोरोनाचे नवे चार रुग्ण सापडले आहेत तर संगमनेरात कोरोनाचा 12 वा बळी गेल्याने जिल्ह्यात हाहाकार उडाला आहे. श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन मध्ये रुग्णांची संख्या वाढतीच आहे. येथे आज सकाळी पुन्हा चार नवे रुग्ण सापडल्याच्या चर्चेने श्रीरामपूरमध्ये प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. दरम्यान, याप्रकरणी अधिकृत माहिती मिळालेली नव्हती. मात्र आज  तातडीने श्रीरामपुरात जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी भेट दिली आहे.
 तसेच संगमनेर तालुक्यातही कोरोनाचे थैमान सुरूच असून येथे आज एक नवा रुग्ण सापडला तर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शहरातील  सय्यदबाबा चौकातील 70 वर्षीय वयोवृद्धला कोरोनाची लागण झाली होती. मात्र नाशिक येथे उपचार सुरू असताना त्यांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे  संगमनेर तालुक्याचा कोरोनाने मृत्यू झालेला आकडा 12 वर जाऊन पोहचला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत