राहुरीत रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामार्‍या ; बाजार समितीच्या संचालकासह चौघांवर गुन्हा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामार्‍या ; बाजार समितीच्या संचालकासह चौघांवर गुन्हा

उंबरे ः वेबटीम    रस्त्याच्या वादातून सख्खा भाऊ पैका वैरी बनल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडली. येथे बाजार सम...

उंबरे ः वेबटीम   
रस्त्याच्या वादातून सख्खा भाऊ पैका वैरी बनल्याची घटना नुकतीच राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे घडली. येथे बाजार समितीचे संचालक आण्णासाहेब बाचकर व त्यांचे बंधू पाटीलबा बाचकर यांच्यामध्ये काल तुंबळ हाणामार्‍या झाल्या. त्यात पाटीलबा बाचकर हे गंभीर जखमी झाल्याने  याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पाटीलबा रंगनाथ बाचकर, वय 55 वर्षे, राहणार गोटुंबे आखाडा तालूका राहुरी. हे राहुरी तालुक्यातील गोटूंबे आखाडा येथे पत्नी मिराबाई पाटीलबा बाचकर, मुलगा कुंदन पाटीलबा बाचकर असे कुटुंबासह एकत्रीत राहतात. पाटीलबा बाचकर हे सध्या पाटबंधारे विभाग राहुरी येथे नोकरीस आहे. तसेच त्यांच्या घराचे शेजारी आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा त्याचे कुटुंबासह एकत्रीत राहत आहे. पाटीलबा बाचकर आणि अण्णासाहेब बाचकर या दोघांमध्ये रस्त्याचे जाणे येण्यावरुन वाद आहेत. दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पाटीलबा बाचकर हे अण्णासाहेब बाचकर याचे घरा समोरील रस्त्यावरुन कामावर जात असतांना तेंव्हा आण्णासाहेब रंगनाथ बाचकर हा हातात लोखंडी कु-हाड घेवुन, अमोल आण्णासाहेब बाचकर हा हातात लाकडी दांडा घेवुन तसेच तेजस आण्णासाहेब बाचकर व अनिता आण्णासाहेब बाचकर हे तिथे आले व पाटीलबा बाचकर यांना शिवीगाळ करुन या र स्त्याने जायचे नाही, असे म्हणून शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातून हाणामार्‍या झाल्या. त्यात आण्णासाहेब बाचकर यांनी पाटीलबा यांना मारहाण केली. त्यांच्या कुटूबालाही मारहाण झाल्याची फिर्याद पाटीलबा यांनी दिल्याचे समजले आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत