उंबरे ग्रामपंचायतीवर ‘प्रशासक’ म्हणून अनेकजणांनी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, यामध्ये काही नावे आघाडीवर असून यामधून एकाची किंवा अनपे...
उंबरे ग्रामपंचायतीवर ‘प्रशासक’ म्हणून अनेकजणांनी मोर्चेबांधणी केली आहे. मात्र, यामध्ये काही नावे आघाडीवर असून यामधून एकाची किंवा अनपेक्षितपणे अन्य दुसऱ्या व्यक्तीची या पदावर वर्णी लागेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, नामदार प्राजक्त तनपुरे यांची शिफारस महत्वाची असल्याने इच्छुकांमधून मोठी फिल्डिंग लावली जाणार आहे. दरम्यान, शासनाचे प्रशासक पद भोगणार्या व्यक्तीस आगामी निवडणुकीत लढण्यास अपात्र ठरविण्यात येण्याची शक्यता असल्याने या पदाबाबत संभ्रम कायम आहे, मात्र किमान पाटी लागेल या हेतूने तालुक्यात मोठा घोडेबाजार होण्याचे संकेत आहेत.
कैलास आडसुरे ः आडसुरे हे शिवसेनेचे तालुका उपप्रमुख आहे. गावासाठी त्यांचे नेहमीच योगदान असते. सोनई पाणी योजनेतून गावाला पाणी मिळवून देण्यात त्यांचा सिंहांचा वाटा होता. याशिवाय सध्याच्या कोरोना दक्षता कमेटीत त्यांनी मोलाची कामगिरी बजावत गावाला सुरक्षित ठेवले आहे. तरुणांचे मोठे।पाठबळ आहे, एक नंबर पसंती आहे
प्रा. रामकृष्ण ढोकणे ; प्रा. ढोकणे हे गावचे भूमिपुत्र आहेत. त्यांनी ग्लोबल स्कुलच्या माध्यमातून उंबरे गावाचे नाव मोठे केले आहे. त्यांना समाजसेवीची आवड आहे. त्यांच्याकडे व्हिजन आहे. मध्यंतरी गावात त्यांनी हायमॅक्स देवून योगदान दिले आहे.
ज्ञानदेव क्षीरसागर ः क्षीरसागर हे एक सुशिक्षीत व उत्तम विचारांची तिजोरी असलेले व्यक्तीमत्व. गावच्या राजकारणात त्यांचा नेहमीच सहभाग असतो. गावात चांगली कामे झाली पाहिजे, गावकर्यांना सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी त्यांनी अनेकदा आपल्या कल्पना मांडल्या आहेत.
बाळासाहेब महाराज डेंगळे ः एक धार्मिक विचारांचा पगडा असलेले अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. त्यांना राजकारणात रस नसला तरी गावातील सामाजिक सुधारणा, सोयीसुविधा याविषयी तळमळ आहे. उच्च शिक्षण ही देखील त्यांची जमेची बाजू आहे.
गंगाधर आडसुरे ः एक हसतमुख व्यक्तीमत्व, ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनुभव आहे. जनतेविषयी तळमळ तसेच गावातील प्रश्न सोडविण्याची त्यांच्याकडे हातोटी आहे. एक ‘किंगमेकर’ म्हणून त्यांची ओळख आहे.
विलासराव ढोकणे ः सोसायटीचा अनुभव आहे. जनसामान्यांची कामे करण्याची हातोडी आहे. गावात विकासाचे नवीन प्रकल्प, साामाजिक उपक्रम राबविण्याची त्यांच्याकडे कल्पना आहेत. युवकांचे आशास्थान आहेत, एक प्रगतशील शेतकरी म्हणूनही ते गावात परिचित आहेत.
कारभारी ढोकणे ः सोसायटीचे माजी चेअरमन आहेत, गावातील राजकारणाची प्रचंड माहिती आहे, अनुभवाची मोठी शिदोरी त्यांच्याकडे आहे. सज्जनवाडी येथील असले तरी गावात त्यांची उठबस असते. गावातील प्रश्नांची त्यांना जाण आहे, यापुर्वीही अनेकदा त्यांनी ग्रामसभेत गावातील समस्यांवर आवाज उठवला आहे. बाबासाहेब सासवडे ः एक हजरजबाबी व्यक्तीमत्व आहे. मनमिळावू स्वभाव, सोसायटी चेअरमनपदाचा अनुभव आहे. समाजातील प्रश्नांची जाण आहे. राजकारणात फारसे सक्रिय नसले तरी त्यांच्या अनुभवाचा गावाला फायदा होवू शकतो.
संतोष ढोकणे ः युवानेतृत्व तथा भावी सरपंच म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. नेहमीच मदतीला धावणारा ‘मित्र’ म्हणून त्यांच्याभोवती संवगड्यांचा मेळा भरलेला असतो. राजकारणात कोरी पाटी मात्र राजकारणाचा पक्का अभ्यास आहे. यातून गावाचा विकास करण्यासाठी ते सक्षम ठरू शकतात.
चांगदेव ढोकणे ः शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता ते गटप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सोसायटीच्या राजकारणाचा भक्कम अनुभव त्यांच्यामागे आहे. शिक्षण, अनुभव, जनतेसाठी काम करण्याची मानसिकता त्यांच्याकडे आहे. राजेंद्र उंडे ः ग्रामपंचायत सदस्य पदाचा अनुभव आहे. ओबीसी समाजाचा चेहरा आहे. गावातील प्रश्न सोडविण्याची कुवत आहे. गावाचा खडानखडा माहिती आहे. गावातील पाणीप्रश्न, रस्ते, गटारप्रश्नी त्यांनी यापुर्वीही अनेकदा पाठपुरावा केला आहे.
सुरेशराव उंडे ः सुरेश उंडे यांची गावाविषयी नेहमीचतळमळ असते. आपल्या गल्लीबरोबरच गावातील सर्वच लोकांना ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा मिळाव्यात, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करतात. त्यांच्यासाठी अनेकांचा आग्रह आहे.
डॉ. राहुल जोर्वेकर ः एक युवक नेतृत्व आहे. सुशिक्षीत आहे, विचारांचा वारसा आहे. डॉक्टर पेक्षा असल्याने समाजसेवेची आवड आहे. गावातील प्रश्नांविषयी तळमळ आहे. पाणी योजनेबाबत त्यांचा चांगला अभ्यास आहे.
दत्तात्रय ढोकणे ः स्व. एकनाथ ढोकणे यांचे सुपुत्र. गावात दांडगा परिचय आहे. गावातील राजकारणाची माहिती आहे. तसेच गावातील विविध प्रश्न सोडविण्याची त्यांच्याकडे खूबी आहे. गावात राहिल्याने येथील समस्यांचा त्यांना अनुभव आहे.
कडूभाई पठाण ; मुस्लिम समाजाचेच नव्हे तर हिंदू बांधवांचेही जीवलग मित्र. गावाविषयी प्रचंड आस्था आहे. शिक्षण आहे, चांगले विचार सोबत आहेत, अपंगांसाठी, ज्येष्ठांसाठी तळमळ आहे.
भाऊसाहेब काका ढोकणे ः हॉटेल व्यवसायिक मात्र सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहेत. गोरगरीबांना मदत करणे हा त्यांचा आवडता छंद. माळवाडीच्या प्रश्नांबरोबरच गावातील विवधि समस्यांची त्यांना जाण आहे. त्या सोडविण्याची त्यांच्याकडे कसब आहे.
मिलींद आडसुरे ः प्रा. दत्तात्रय आडसुरे यांचे सुपुत्र व गावचे मार्गदर्शक सुनिल आडसुरे यांचे बंधू. उच्चशिक्षीत, एक प्रगतशील शेतकरी, मित्रांचा मोठा लवाजमा, मनमिळावू स्वभावामुळे गावात परिचित. राजकारणात फारसे सक्रिय नाही मात्र गावाविषयी आपुलकी आणि ज्येष्ठांचा आदर.
*प्रा, जालिंदर दुशिंग : सोसायटीच्या राजकारणाची व कामाची माहिती, प्रशासनाचे मोठे ज्ञान, गावातील समस्यांची जाण, उच्च शिक्षण, स्वच्छ प्रतिमा, काम करण्याची हौस दत्तात्रय तरवडे ः एक पत्रकार ते उपसरपंच असा मोठा अनुभव आहे. ग्रामपंचायत कारभाराचीही माहिती आहे. गावात विविध योजना, वेगवेगळा निधींचा आणण्याबाबत त्यांचा हातखंडा आहे.
जालिंदर ढोकणे ः सोसायटीचे सचिव आहेत, याशिवाय एक पत्रकारही आहेत, त्यांनाही शासकीय कामाचा अनुभव आहे, पत्रकारातेचाही त्यांच्याकडे तगडा अनुभव आहे. एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांचे गावच्या विकासात योगदान आहे.
लक्ष्मण पटारे ः छत्रपती प्रतिष्ठाणच्या माध्यमातून त्यांनी गावाची ओळख जिल्ह्यात नव्हे तर राज्यापर्यंत पोहचवली आहे. छत्रपती पुरस्कार असो किंवा विविध शिबीरे घेवून त्यांनी समाजसेवेचे व्रत अंगी जोपासले आहे. त्यांना समाजाविषयी आत्मीयता आहे. एक पत्रकार म्हणून मोठे योगदान आहे बाळासाहेब बारवेकर ः एक समाजसेवीची आवड आहे. शालेय दाखले, कुणबी दाखले, याशिवाय गरजुंना नेहमीच मदतीची भावना आहे. राजकारणातून निवृत्त आहेत, मात्र गावाविषयी प्रचंड तळमळ आहे. त्यांच्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचा अनुभव असल्याने त्यांचा गावाला फायदा होवू शकतो.
बबनराव ढोकणे ः काँग्रेसचे एक ज्येष्ठ गावपुढारी. तालुक्यातील राजकारणात दबदबा आहे. गावातील राजकारणाची पुरेपूर माहिती आहे. त्यांच्याकडे ग्रामपंचायतीचा अनुभव नसला तरी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे. त्यांना संधी मिळाल्यास एका योग्य व्यक्तीला संधी.
प्रा. बारवेकर (गुरुजी) ः प्राथमिक शिक्षणाचा प्रदीर्घ अनुभव आहे, एक प्रगतशील शेतकरी देखील आहेत. त्यांच्याकडे गावातील विकासाविषयी वेगवेगळ्या कल्पना आहेत. गावातील सर्वच समाज घटकांना न्याय देणारा त्यांच्याकडे‘ मायक्रो प्लॅन’ आहे.
अॅड. कारभारी ढोकणे ः सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव आहे. वकील व्यवसायातून प्रशासनाबाबत मोठी माहिती आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणात ते सक्रीय नसले तरी पडद्यामागून सत्तेची चक्रे फिरविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्याकडे चांगल्या विचारांचा व उत्तम विकासाचा खजिना आहे, साहेबराव क्षीरसागर ; सोसायटीचा अनुभव मात्र एक सामान्य नागरिक, उत्तम शेतकरी, जमिनीवर पाय असणारे, सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध, जनतेविषयी प्रचंड तळमळ, गावासाठी काहीतरी करण्याची तीव्र इच्छा डॉ सतीश दुशिंग : एक हसतमुख व्यक्तिमत्व, वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक, मनामध्ये गावविषयी आस्था, उच्च शिक्षण व नवनवीन संकल्पनेतून गावातील समस्या सोडविण्याची इच्छाशक्ती,
दत्तात्रय ढोकणे (वकील) : आळंदी वारीतील एक सदस्य, मनमिळावू स्वभाव, मोठी विचारधारा, गावातील मूलभूत प्रश्नांची जाण, राजकारणात कोरी पाटी, राजकीय लोकात उठबस रविनाना ढोकणे : सहकारातील मोठ्या अनुभवामुळे जणूकाही पीएचडीचा अभ्यास, प्रशासकीय कामाचा अनुभव, कायद्याचे ज्ञान, सदस्य म्हणून गावात राजकारणात योगदान, गावातील समस्या ज्ञात
संदीप नाना ढोकणे : एक शांत व तरुणांसाठी आदर्श माणूस, मितभाषी स्वभाव, गावविषयी तळमळ, प्रश्नांची जाण, समस्या सोडविण्याची कसब, तरुणांचे पाठबळ
विजय ढोकणे : शिवसेनेचे तालुका प्रमुख, सोसायटीचा अनुभव, गावात काम करण्याची इच्छा, सामाजिक कार्यात योगदान, राजकीय मोठी ताकद
सुरेशराव वाघ ; माहिती अधिकार कार्यकर्त्या, दुग्ध व्यबवसायिक, तरुण व युवकांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व, शिक्षित व गावासाठी काम करण्याची मानसिकता, अनुभव नाही, मात्र प्रबळ इच्छाशक्ती
नाना खंडू ढोकणे ; एक मनमिळावू माणूस, जनतेची कामे करण्याची आवड, ग्रामपंचायतीचा अनुभव, निधी बाबत पुरेशी माहिती, समस्या सोडविण्यात तरबेज, सर्वांना विचारात घेऊन वाटचाल करण्याची सवय . लक्ष्मणराव ढोकणे : एक किराणा व्यवसायिक, मात्र गावाशी अतूट नाते, नेहमी स्मितभाषी व हसतमुख, गावविषयी तळमळ, प्रश्नांची जाण, सुपुत्र अनिल व सुनील यांच्यावर संस्कार विलासराव गरुड ; राजकारणापासून स्वतःला अलिप्त ठेवणारे व्यक्तीमत्व आहे. गावातील समस्यांची जाण व त्या मुळापासून सोडविण्यासाठीचेW त्यांच्याकडे प्लॅनिगं आहे. शिक्षण S तळमळ ही दोन त्यांची बलस्थाने आहेत. पारदर्शी कारभाराबाबत त्यांचा आदर्श ठरू शकतो.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत