राहुरीत ‘वाड्या’पासून हाकेच्या अंतरावर कोरोनाची धडक - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत ‘वाड्या’पासून हाकेच्या अंतरावर कोरोनाची धडक

राहरी ः वेबटीम  राहुरीत सकाळच्या सत्रात तांदुळवाडीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील राहुरी फॅक्टरी येथील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल...

राहरी ः वेबटीम 
राहुरीत सकाळच्या सत्रात तांदुळवाडीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कातील राहुरी फॅक्टरी येथील तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आज सायंकाळी ‘वाड्या’पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भागात एक बाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. 
 राहुरीत कोरोनाने धुमाकूळ घालण्यास प्रारंभ केला आहे. आज दिवसभरात चार रुग्ण आढळल्याने प्रशासन याकामी उपाययोजना राबवित असतानाच सायंकाळी पुन्हा एक रुग्ण आढळला. हा रुग्ण शहरातील मध्यवर्ती भागात आढळल्याने राहुरीकरांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. संबधित रुग्ण हा व्यवसायिक असल्याचीही माहिती समजते. याशिवाय तो ‘वाड्या’जवळ नसला तरी त्या पासून काही अंतरावरील एका भागात असल्याचीही म ाहिती पुढे आली आहे.
दरम्यान, तहसीलदार व पोलिस प्रशासनाने जनतेला दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. जनतेच्या सुरक्षीततेसाठी प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत असताना जनतेही त्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. तरच, ही लढाई आपण जिंकणार आहोत. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे भान ठेवून शासनाच्या नियमांचे पालन करावे,असे आवाहन केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत