अकोले : वेबटीम अकोले तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेेंगडे यांना लाचलुचपत विभागाने सापळा लावून लाच प्रकरणी ताब्यात घेतले. एका ठे...
अकोले : वेबटीम
अकोले तालुक्याचे गटविकास अधिकारी भास्कर रेेंगडे यांना लाचलुचपत विभागाने सापळा लावून लाच प्रकरणी ताब्यात घेतले. एका ठेकेदारकडे काही रकमेची मागणी केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, नाशिकच्या पथकाने आज गुरूवार दि. 16 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली आहे. आज सायंकाळी याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान एका ठिकाणी दलितवस्ती येथे एका ठिकाणी काम सुरू होते. ते काम झाल्यानंतर त्याचे एक बील अडकले होते. त्यासाठी बीडीओ यांनी काही रकमेची मागणी केली होती. त्यांनी संबंधित रक्कम स्विकारताना त्यांनी एक नोट गिळल्याचे बोलले जात होते. खरतर गेल्या काही दिवसांपुर्वी रेंगडे यांनी एक जणावर कारवाई केली होती. त्या ग्रामसेवकाच्या करवी हा प्रकार घडवून आणला गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांची मेडिकल करण्यासाठी एका खाजगी ठिकाणी नेण्यात आले आहे. सोनोग्राफी दरम्यान यातील सत्य बाहेर येईल अशी माहिती गोपनिय सुत्रांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत