राहुरी : वेबटीम श्रीकांत जाधव राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रस्त्यावरील एका कॉलनीतील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती तर देवळाली प्रवरा शहर...
राहुरी : वेबटीम श्रीकांत जाधव
राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर रस्त्यावरील एका कॉलनीतील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती तर देवळाली प्रवरा शहरातील २ व्यक्ति कोरोना बाधित आढळल्याने खळबळ उडाली असताना आता टाकलिमिया, गुहा व देसवंडी मध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे.सकाळी देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ५० रॅपीड टेस्ट घेतल्यानंतर वरील ५ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, त्यात देवळाली ५ जण होते ,तर त्यांनतर टाकळीमियॉ ८ जण बाधित आढळले असून त्यात ३ पुरुष व ५ महीला आहेत, तसेच गुहा २ बाधित असून त्यात *१ पुरुष,१ महीला समावेश आहे. याशिवाय देसवंड़ी १ महीला कोरोना बाधित सापडली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत