राहुरी : वेबटीम कोवीड बाधित रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेत असेल किंवा त्यामुळे त्याचे वेळेत निदान न झाल्यामुळे कोवीड हॉस्पीटलमध्ये दाखल ...
राहुरी : वेबटीम
कोवीड बाधित रुग्ण खासगी डॉक्टरकडे उपचार घेत असेल किंवा त्यामुळे त्याचे वेळेत निदान न झाल्यामुळे कोवीड हॉस्पीटलमध्ये दाखल होण्यास त्यास उशीर होतो.त्यातून जर त्याचा मृत्यू झाला तर त्याचे डेथ ऑडीट केले जाणार आहे. त्यात दोष आढळणार्या डॉक्टरवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार फैसोद्निन शेख यांनी दिली आहे. दरम्यान, खासगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांवर अंकुश ठेवतानाच ग्रामीण भागातील बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी एक पथक तयार करण्यात आल्याचेही समजले आहे.तहसीलदार शेख यांनी एक आदेश काढून त्यात खासगी डॉक्टर व औषध विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. या आदेशात काही बोगस डॉक्टसर यांचेकडे कोणतीही पदवी नसताना ते प्रॅक्टीस करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यास प्रतिबंध घालण्यासाठी तालुका स्तरावर याची तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाकडून गावोगावी तपासणी करून त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
एखाद्या रुग्णाला ताप, घशात खवखव, स्वशनाचा त्रास, सर्दी, थंडी वाजणे, अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा, उलटी, खोकल्यातून रक्त अशी कोवीडची लक्षणे दिसत असल्याच त्या रुग्णाचा संशयीत रुग्ण म्हणून त्वरीत उपचार सुरू करावेत. अशा रुग्णांना तत्काळ विद्यापीठात पाठवावे. सदर रुग्णाची टेस्ट घेतली की नाही याची संबधित खासगी डॉक्टरने माहिती घ्यावी तसा पाठपुरावा करावा. खासगी डॉक्टर मार्फत तशा रुग्णांच्या नावाची यादी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे देण्यात यावी. या यादीनुसार तपासणी झाली किंवा नाही याची नोडल अधिकारी पाहणी करणार. जनरल प्रॅक्टीशन डॉक्टरकडून रुग्णांवर उपचाराची दिशा चुकत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रुग्णास निदान होईपर्यंत्त उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मागील आठ दिवसात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर खासगी डॉक्टरांनी उपचार केेले असतील तर त्या रुग्णांची माहिती बोलावली जाणार असून त्यांची टेस्ट केली जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत