खासदार सुजय विखेंची 6 कोटी उधारी कुणाकडे ? वाचा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

खासदार सुजय विखेंची 6 कोटी उधारी कुणाकडे ? वाचा

 अहमदनगर : वेबटीम        भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविक...

 अहमदनगर : वेबटीम       

भाजप सरकारच्या काळात ५ वर्षे चांगली सुरू असलेल्या महात्मा फुले जीवनदायिनी आरोग्य योजनेची विमा कंपनी विद्यमान महाविकास आघाडी सरकारने का बदलली याचे उत्तर आधी दिले जावे तसेच ही कंपनी आल्यापासून माझ्याच विखे हॉस्पिटलची सुमारे ६ कोटीची रखडलेली उधारी आधी द्यावी, अशी मागणी  खासदार डॉ.सुजय विखे यांनी  केली.
महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या अँजिओप्लास्टी व अन्य वैद्यकीय उपचारांचे पैसे विमा कंपनी बदलल्यामुळे मागील ३ महिन्यांपासून मिळालेले नाहीत, कोरोनामुळे महापालिका हद्दीतील प्रसुती सेवा मी विखे हॉस्पिटलद्वारे दिली, सिझरला १९ हजार व नॉर्मल डिलेव्हरीला ९ हजाराप्रमाणे आकारणी केली, पण त्या १५० ते २०० प्रसुतींच्या ५० लाखाच्या रकमेपैकी १ रुपयाही सरकारकडून मिळालेला नाही, त्यामुळे महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून केलेल्या उपचारांचे पैसे देण्याची शाश्वती महाविकास आघाडी सरकारने आधी द्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत