देवळाली प्रवरा नगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांत खदखद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगरपालिकेत सत्ताधारी नगरसेवकांत खदखद

देवळाली प्रवरा : वेबटीम    देवळाली प्रवरा नगरपालिका नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध नगरसेवकांमधुन  नाराजीचा सुरू उमटवयास  सुरवात झाली...

देवळाली प्रवरा : वेबटीम   

देवळाली प्रवरा नगरपालिका नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्याविरुद्ध नगरसेवकांमधुन  नाराजीचा सुरू उमटवयास  सुरवात झाली असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सत्ताधारी गटातील  नगरसेवक आदिनाथ कराळे यांनी अमरधाम रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा प्रश्नी आंदोलनात घेतलेला सहभाग देवळाली पालिकेत गेल्या चार वर्षापूर्वी कदम नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी आपल्या मर्जीतील नगरसेवकाना जवळ केले. तर काही नगरसेविकांच्या पतीराजांना  तर काही  नगरसेवकांच्या मुलाला आरोग्य विभागाचा ठेका दिला. नगराध्यक्ष कदम यांच्या हाला हा म्हणणाऱ्या नगसेवकाच्या प्रभागातील काम करून त्यांना ताकद दिली. काही सत्ताधारी नगरसेवकांशी प्रभागातील कामाबद्दल पुसटशी चर्चाही केली जात नाही. जे नगरसेवक हांजी हांजी करता  त्याच नगरसेकांचे नगराध्यक्ष ऐकतात हि गोष्ट नाराज नगरसेवकांचे लक्षात येताच त्यांनी पालिकेचे तोंड बघायला नको असा ठाम निर्धार केला असल्याचे पहावयास मिळत आहे.

         

      नागरीकांच्या पाठबळावर निवडून आलेल्या नगरसेवकांना विकास कामा बाबत नागरीकांना तोंड द्यावे लागत आहे.नागरीकांना काय उत्तर द्यावे याचा प्रश्न सत्ताधारी गटातील काही नगरसेवकांना पडला आहे. सत्ताधारी गटातील नगरसेवक व सध्या उघडपणे विरोध करीत असलेले अदिनाथ कराळे यांनी स्वखर्चातून बिरोबावाडी येथे उभारलेला स्ट्रीट लाईट पोल व कराळेवाडीतील गतिरोधक उभारणी उत्तम उदाहरण असल्याचे यानिमित्ताने पुढे आले आहे. नगरसेवक  कराळे हे पालिका नगराध्यक्ष  कदम यांच्या विरुद्ध नाराज असल्याचे जनतेतून बोलले जात होते.परंतू  शुक्रवारी सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरातील जागरुक नागरिक यांनी डॉ.तनपुरे कारखाना हद्दीतील अमराधाम रस्त्यावर नगरपालिका आरोग्य ठेकेदाराने कचरा टाकून रस्त्या बंद केल्यामुळे आंदोलन केले या आंदोलनात कराळे यांनी उघडपणे सहभाग नोंदवून  सहभाग घेतल्याने नाराजी स्पष्ट पणे उघड झाली आहे.    नगरसेवक कराळे यांनी सुरवाती पासुन अनेक विकास कामे सुचवली होती. परंतू विकास कामासाठी म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.कराळे यांनी स्वखर्चातुन बिरोबावाडी येथे  स्ट्रीट लाईट उभारला.नव्हे तर आपल्या प्रभागात छोट मोठे अपघात होत असल्याने स्पीड ब्रेकरची काम ही केली. स्वखर्चातुन केलेल्या कामामुळे  नगरसेवक आदिनाथ कराळे  हे नगराध्यक्ष कदम यांच्या विरुद्ध उघड नाराज असल्याचे दिसून येत  आहे.सत्ताधारी गटातील  अजून काही  नगरसेवक नाराज आहेत. मात्र ते सध्या हाताची घडी तोंडावर बोट ठेवून निर्णय घेण्याच्या प्रतीक्षेत आहे.तेही लवकर उघड भूमिका घेण्याच्या पावित्र्यात असल्याचे समजते.

                     नगर पालिकेच्या कारभारा बाबत नगराध्यक्ष कदम हे स्वतःहा निर्णय घेण्या ऐवजी दुसऱ्या पक्षातून भाजपात सामिल झालेल्या नगरसेवकाच्या हातात सर्व निर्णय अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. तो नगरसेवक हा म्हणाला तरच दुसऱ्या नगरसेवकाच्या प्रभागातील विकास कामे मंजुरीसाठी घेतली जातात. अनेक वेळा हा नगरसेवक नगराध्यक्ष यांच्याशी नगरसेवकांची जवळकी निर्माण होवू नये म्हणून त्या नगरसेवकांची  विकासकामे नगराध्यक्ष यांच्या पर्यंत जाणार नाही याची काळजी घेतली जाते. त्या नगरसेवकाने  मागिल दोन  वर्ष आरोग्य विभागातील कामे झाडलोट पासुन ते कचरा गोळा करण्या पर्यंत सर्व ठेका स्वतःहा अधिपत्याखाली  घेवून ते ज्या पक्षातून आले त्यातील एका कार्यकर्त्यांच्या नावावर घेवून सर्व व्यवहार स्वतःच्या हाथी ठेवले होते. या ठेक्यातुन गडगंज माया कमावली असल्याची चर्चा नगरसेवकांत रंगत आहे.     नगराध्यक्ष कदम यांच्या दालनात मर्जीतील नगरसेवक व कार्यकर्ते यांच्या व्यतीरीक्त कोणी दिसत नाही. नाराज नगरसेवकांनी माञ नगर पालिका कार्यालयाकडे पाठ फिरविली  आहे. पालिकेच्या उपनगराध्यक्ष  संसारे यांना तर वर्तमान पञातील आरोपांना उत्तर देण्यासाठीच  नियुक्ती केली आहे. असे अनेक नगरसेवक खाजगीत बोलताना सांगतात. नाराज नगरसेवक आताच पुढील पुर्वीच्या पक्षात पुन्हा स्थान मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.



भाऊ अ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत