दिल्ली : वेबटीम कोरोना संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत 8 कोरोन...
दिल्ली : वेबटीम
कोरोना संकट असतानाच आणखी एक भीषण दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत 8 कोरोनाग्रस्तांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. आगीनं रौद्र रुप धारण केल्यानं रुग्णालयात मोठी खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार गुजरातच्या अहमदाबाद इथे नवरंगपुरा परिसरातील श्रेय रुग्णालयात भीषण आग लागली. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी तातडीनं पावलं उचललं मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रुप धारण केलं होतं. त्यामुळे या आगीत होरपळून ICU मधील 8 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
श्रेय रुग्णालय हे कोविड-19 रुग्णांसाठी करण्यात आलं होतं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत