राहुरी : वेबटीम नगर दक्षिण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सकाळी 6400 कुसेकने आवक सुरू होती तर धरणात 49 टक्के म्हणजेच12,500 दलघफु...
नगर दक्षिण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या मुळा धरणात आज सकाळी 6400 कुसेकने आवक सुरू होती तर धरणात 49 टक्के म्हणजेच12,500 दलघफु पाणीसाठा झाला होता. त्यामुळे उद्या धरण निम्मे भरण्याच्या आशा उंचावल्या आहे.
राहुरी, नेवासा, शेवगाव व पाथर्डी या चार तालुक्यासह नगर, एमआयडीसी, देवळाली, राहुरी नगरपरीषद तसेच अन्य पाणी योजनांना मुळा धरण एक वरदान ठरलेले आहे. पावसाळ्यात मुळा धरण भरले तरच शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन होते, तसेच उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत नाही, त्यामुळे दरवर्षी प्रमाणेच यंदाही लाभक्षेत्रातील जनतेच्या मुळा धरणाकडे नजरा आहेत. मात्र अजून पाणलोटात पाऊस नसल्याने धरणात होणारी आवक कमीच आहे मात्र कालपासून पावसाने जोर धरला आहे, त्यामुळे काल रात्री 7000 कुसेकने त् धरणात आवक सुरू होती. परंतु आज पुन्हा आवक थोडी कमी झाल्याने 6400 कुसेकने पाणी सुरू होते. अशीच आवक सुरू राहिली तर उद्या धरण निम्मे भरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत