बाबरी मस्जिद तेरा बदला है...! श्रीरामपुरात जातीय तेढ, एकावर गुन्हा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बाबरी मस्जिद तेरा बदला है...! श्रीरामपुरात जातीय तेढ, एकावर गुन्हा

श्रीरामपूर : वेबटीम      श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्या दरम्यान जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज किंवा  भावना भडकविणार्या पोस्ट करू नये, असे ...

श्रीरामपूर : वेबटीम     
श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्या दरम्यान जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज किंवा  भावना भडकविणार्या पोस्ट करू नये, असे प्रशासनाने सूचना केल्या असतानाही श्रीरामपुरात तोफिक शब्बीर शेख याने फेसबुकवर   बाबरी मस्जिद तेरा बदला है कर्ज हम पर" असा मेसेज टाकला असुन त्याखाली मुस्लीम युवकांनी त्यावर कमेंट केलेल्या असुन त्यावर त्यानी कुते की मोत मारेंगे असा रिप्लाय दिला आहे, त्यामुळे जातीय तेढ निर्माण झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 
      आयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भुमिपुजन होणार आहे हे माहिती असतांना आरोपीने फेसबुकवरुन आयोध्यामध्ये असलेली बाबरी मशीद पाडल्यामुळे "बाबरी मस्जिद तेरा बदला है कर्ज हम पर" असा मेसेज टाकला असुन त्याखाली मुस्लीम युवकांनी त्यावर कमेंट केलेल्या असुन त्यावर त्यानी कुते की मोत मारेंगे असा रिप्लाय दिला आहे,  त्यामुळे दोन जाती मध्ये व गटामध्ये शत्रुत्व वाढुन शहरातील एकोपा धोक्यात आला आहे.व हिंदु-मुस्लीम एकोपा टिकण्यास बाधा निर्माण होईल असे कृत्य केले आहे. याप्रकरणी पोको अमोल वसंत गायकवाड यांनी दिलेल्या  फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत