राहुरीत 6 रुग्ण, देवळालीचे राजकीय कुटुंब बाधित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत 6 रुग्ण, देवळालीचे राजकीय कुटुंब बाधित

राहुरी : वेबटीम   राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पुन्हा 6 रुग्ण सापडले असून त्यात देवळाली प्रवरा येथील राजकीय कुटुंब...

राहुरी : वेबटीम 
 राहुरी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज पुन्हा 6 रुग्ण सापडले असून त्यात देवळाली प्रवरा येथील राजकीय कुटुंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली असून राहुरी शहर व सोनगाव येथे प्रत्येकी1-1 रुग्ण आढळला आहे. दरम्यान, आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात गेल्या महिन्यात  कोरोनाचे एकूण १३ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले असता त्यातील १२ व्यक्तीना घरी सोडण्यात आले. यातील पशु वैद्यकीय क्षेत्रातील एका व्यक्तीचा अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यानंतर देवळाली प्रवरा व राहूरी फॅक्टरी परिसरात कोरोना रूग्ण सापडले नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला होता.मात्र आज देवळाली प्रवरा येथील पिता-पुत्रांनी अहमदनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये बुधवारी घशातील स्त्राव तपासणी केला असता आज दोघांचाही अहवाल  कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील दोन महिलाही पॉझिटिव्ह आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. अण्णासाहेब मासाळ यांनी दोघांनाही पुढील उपचारासाठी विवेकानंद नर्सिंग होम येथे पाठवले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत