अहमदनगर : वेबटीम सुशांतसिंग प्रकरणात आणखी भरपूर गोष्टी पुढे यायच्या आहेत. या प्रकरणातील जी मुख्य आरोपी अभिनेत्री आहे, ती खरचं भारतात आहे...
- अहमदनगर : वेबटीम
सुशांतसिंग प्रकरणात आणखी भरपूर गोष्टी पुढे यायच्या आहेत. या प्रकरणातील जी मुख्य आरोपी अभिनेत्री आहे, ती खरचं भारतात आहे का, अशी शंका उपस्थित होत आहे. जसे सीबीआय तपास करेल तशा या गोष्टी समोर येतील. पण ज्या अभिनेत्रीवर आरोप होतोय, तीच जर उद्या सापडली नाही, नाहिशी झाली, तर याची जबाबदारी राज्य सरकारवर निश्चित केली जाईल,’ असे वक्तव्य खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले. ते नगरमध्ये बोलत होते.
‘सुशांतसिंग प्रकरणाच्या तपासात प्रदिर्घ काळ गेला आहे. त्यामुळे आरोपीला कुठे जाण्यास वेळ मिळाला असेल तर, ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्यावरच जबाबदारी येणार,’ असेही विखेंनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा सीबीआयकडे तपास गेल्यानंतर काय वास्तविकता आहे, ती समोर येईल, याची खात्री आहे. जी काही सत्य परिस्थिती आहे, ती बाहेर येईल. मात्र आज संबंधित अभिनेत्रीचा फक्त वकिल बोलतोय. त्या कुठे दिसत नाही. त्यामुळे त्या खरचं इथे आहेत का? यामध्ये किती मोठे षडयंत्र असू शकते? हे सीबीआयच्या माध्यमातून जनतेसमोर येईल,’ असेही विखे म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत