दिल्ली ः वेबटीम आग्रा येथील महिला डॉक्टरच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या डॉक्टरच्या हत्येच्या घटनेने शहरात खळबळ माजली आह...
दिल्ली ः वेबटीम
आग्रा येथील महिला डॉक्टरच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. या डॉक्टरच्या हत्येच्या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. प्रियकर असलेल्या डॉक्टरनेच तिची निर्घृण हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने हत्येची कबुली दिली आहे. कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडील कार आणि चाकू हस्तगत केला आहे.
दोन दिवसांपूर्वी डौकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बमरौली कटारा हद्दीतील मोकळ्या भूखंडावर एका महिलेचा मृतदेह सापडला होता. मृत महिलेकडे कोणतेही ओळखपत्र किंवा फोन मिळाला नाही. मृत महिलेच्या गळ्यावर आणि डोक्यावर जखमा होत्या. पोलिसांनी महिलेचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. दुसरीकडे आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने महिला डॉक्टरच्या हत्येची कबुली दिली आहे. गळा आवळल्यानंतर चाकूने तिच्यावर वार करून हत्या केली, असे तो या व्हिडिओत सांगत आहे.
एसएन मेडिकल कॉलेजमध्ये ज्युनिअर डॉक्टर योगिता गौतम असे हत्या झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. दिल्लीच्या शिवपुरी परिसरात राहत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. नुरी दरवाजा परिसरात भाड्याच्या खोलीत ती राहत होती. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, एसएन मेडिकलमध्ये २०१७ मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिची मैत्री वरिष्ठ डॉक्टर विवेक तिवारी याच्यासोबत झाली होती. विवेक सध्या उरईमध्ये वैद्यकीय अधिकारी आहे. डॉक्टर विवेक आणि योगिता यांची सात वर्षांपासून मैत्री होती. बऱ्याच काळापासून विवेक हा योगितावर लग्नासाठी दबाव आणत होता. मात्र, योगिताने त्याला नकार दिला होता. त्यामुळेच त्याने ही हत्या केली, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे.
'अशी' केली हत्या
आरोपी डॉक्टर विकास तिवारी याला उरई येथून अटक केली. त्याला एमएमएम गेट पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला त्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी त्याने योगिताची भेट घेतली. तिला कारमध्ये बसवून तो घेऊन गेला. कारमध्येच दोघांमध्ये बाचाबाची झाली. रागाच्या भरात त्याने योगिताचा गळा आवळला. त्यानंतर तिला बमरौली कटाराच्या दिशेने घेऊन गेला. कारमध्ये ठेवलेल्या चाकूने तिच्यावर सपासप वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह झुडपात टाकला. त्यानंतर परत तो उरईला निघून गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत