राहुरी ः वेबटीम भंडारदरा भरल्यानंतर निळवंडे 83 टक्के झाले आहे तसेच मुळा धरणात काल सायंकाळी आवक वाढून ती 8373 कुसेकने सुरू होती तर धरणाचा प...
राहुरी ः वेबटीम
भंडारदरा भरल्यानंतर निळवंडे 83 टक्के झाले आहे तसेच मुळा धरणात काल सायंकाळी आवक वाढून ती 8373 कुसेकने सुरू होती तर धरणाचा पाणीसाठा 20 हजार 500 दलघफू इत्तका झाला होता. धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने शेतकर्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
नगर दक्षिण जिल्ह्यासाठी वरदान ठरणारे मुळा धरण यंदाही भरणार आहे. गेल्या वर्षीही हे धरण भरल्याने शेतकर्यांना उन्हाळ्याच्या झळा बसल्या नव्हत्या. शिवाय पिकांचेही योग्य नियोजन करणे शक्य झाले होते. त्यामुळे यंदाही हे धरण भरावे, अशी शेतकर्यांची इच्छा होती. त्यानुसार मुळा धरणात सायंकाळी आवक वाढली आहे. तर पाणीसाठाही झपाट्याने वाढत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत