श्रीगोंदयात युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीगोंदयात युवक काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण

 श्रीगोंदा : विनोद डोळस    भारत देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे (महसूलमंत्री व काँग्रेसचे प...

 श्रीगोंदा : विनोद डोळस   

भारत देशाचे माजी प्रधानमंत्री भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे (महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) ना. बाळासाहेबजी थोरात, (महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष) सत्यजित दादा तांबे तसेच (युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव) हेमंत तात्या ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या वतीने श्रीगोंदा शहरात वृक्षारोपण करण्यात आले.


यावेळी महाराष्ट्र युवक प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस प्रशांत भैय्या ओगले, श्रीगोंदा नगरपरिषदेचे मा. उपनगराध्यक्ष राजुदादा गोरे, श्रीगोंदा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. गोरख बायकर, श्रीगोंदा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष योगेश मेहेत्रे, पेडगाव ग्रामपंचायत सदस्य रामदास जंजिरे, प्रवीण ढगे, आदेश शेंडगे, प्रशांत सिदनकर, नितीन खेडकर, गंगाराम खोटे, भैय्या उदमले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत