विषारी दारुकांड; 86 जणांचा बळी, अधिकारी निलंबित - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विषारी दारुकांड; 86 जणांचा बळी, अधिकारी निलंबित

दिल्ली  :  वेबटीम        महाराष्ट्रात आपल्या नगर जिल्ह्यात घडलेल्या पांगरमल दारू कांडापेक्षा महाभयंकर घटना पंजाब मध्ये घडली आहे. विषारी दारू...

दिल्ली  :  वेबटीम       
महाराष्ट्रात आपल्या नगर जिल्ह्यात घडलेल्या पांगरमल दारू कांडापेक्षा महाभयंकर घटना पंजाब मध्ये घडली आहे. विषारी दारूमुळे येथे आतापर्यंत तब्बल  86 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, अंत्यविधी करून घरीयेईपर्यंत आणखी 2-3 जनांचा मृत्यू गावात सुरू असल्याने 36 तासापासून अनेक गावांत चूल पेटली नसल्याचे दिसत आहे.
 
तरन तारनच्या एसएसपींनी कारवाई करत दोन पोलिस ठाण्यांचे प्रभारी आणि एका डीएसपीला निलंबित केले आहे. अंमली पदार्थांचा अवैध व्यवहार करणाऱ्या माफियांशी या अधिकाऱ्यांचा संबंध आहे का? याची चौकशी पोलिस करत आहेत. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाखा रुपयंची मदत जाहीर केली आहे. तर उत्पादन शुल्क विभागातील ७ अधिकारी, २ पोलीस उपअधीक्षक आणि ४ एसएचओंना निलंबित केलं आहे. तसंच त्यांची चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत.
तरन तारनमधील मृतांची संख्या 66 वर गेली आहे. जिल्ह्यातील सदर आणि शहरी भागात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. बुधवारी रात्रीपासून तरण तरण व्यतिरिक्त, अमृतसरमध्ये 11 आणि बटालाच्या गुरदासपूर येथे ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, पोलिस उपायुक्त कुलवंत सिंह यांनी शनिवारी दिली.
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी यापूर्वीच या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एसआयटीही तयार केली गेली आहे. ही एसआयटी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल. विषारी दारू बनवणाऱ्या आणि पुरवठा करणाऱ्यांना लवकरच अटक केली जाईल, असं पंजाब सरकारने म्हटलंय.
या प्रकरणातील आरोपी लवकरच तुरूंगात असतील. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फरार आरोपींना पकडण्यासाठी सर्व भागात छापेमारी सुरू आहे, असं पंजाबचे बॉर्डर रेंजचे डीआयजी हरदयालसिंग मान यांनी सांगितलं.
संपूर्ण भागात दारूचा अवैध व्यवसाय सुरू आहे. यामुळे ही बनावट दारू सतत गावात पुरवली जात होती. यामुळे अनेकांचा जीव गेला आहे. बेकायदेशीर दारू बनवण्याचा आणि पुरवठा करण्याच्या धंद्यावर पोलिस नियंत्रण आणू शकलेले नाहीत, असा आरोप तरन तारनमधील मद्य विक्रेत्यांनी केला आहे.
तरन तारन या गावात अतिशय वाईट स्थिती झाली आहे. गावकरी एखाद्याचा अंत्यसंस्कार करून परत येईपर्यंत आणखी दोन-तीन मृत्यू झालेले असतात. अनेक गावांमध्ये गेल्या ३६ तासांपासून चूलही पेटलेली नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत