राहुरी : वेबटीम नगर जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या मुळा धरणाकडे आज सकाळी 2 हजार 650 कुसेकने आवक सुरू असल्याने पाणीसाठा हळूूूहळू वाढत आहे. स...
राहुरी : वेबटीम
नगर जिल्ह्यातील वरदान ठरलेल्या मुळा धरणाकडे आज सकाळी 2 हजार 650 कुसेकने आवक सुरू असल्याने पाणीसाठा हळूूूहळू वाढत आहे.सकाळी मुळा धरणाचा साठा १4 हजार 600 दशलक्ष घनफूटवर पोहोचला. काल सायंकाळी पाण्याची आवक कमी झाली होती. आज सकाळी ती 2650 नेे सुरू होती. हरिश्चंद्रगड भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहमदनगर महापालिका, दोन नगरपालिका, नगर, सुपा एमआयडीसी व अन्य भागाला धरणाच्या पाण्याचा लाभ होतो तर राहुरी, नेवासा, पाथर्डी, शेवगाव या तालुक्यातील पाऊन लाख हेक्टर शेती धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. धरणाच्या पाणी साठ्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत