मुंबई : वेबटीम सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या अ...
मुंबई : वेबटीम
सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. या प्रकरणावरुन शिवसेना-भाजपा यांच्यात संघर्ष वाढल्याचं पाहायला मिळतं. सुशांत सिंग प्रकरणात आदित्य ठाकरेंची विनाकारण बदनामी केली जात असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. मात्र आता शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. सुशांत सिंग प्रकरण सीबीआयकडे देता मग न्यायाधीश लोया आणि भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटणार आहे. सीबीआय चौकशी कधीही करता येते असं नाही, राज्य सरकारने याबाबत केंद्राकडे शिफारस करावी लागते. सीबीआय चौकशी लावण्याचीही काही प्रक्रिया आहे. लोकशाहीचे नियम डावलून कुणीही चौकशी करु शकत नाही, त्यामुळे सुशांत प्रकरणात जसं सीबीआय चौकशी करताय तसं गोपीनाथ मुंडे आणि न्या. लोया प्रकरणात सीबीआय चौकशी करावी, सत्य बाहेर येऊ द्या असं अरविंद सावंत यांनी एबीपी माझाच्या चर्चेत वक्तव्य केले आहे.तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा बिहार पोलिसांचा काय संबंध आहे? मुंबई पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. बिहार सरकारच्या सांगण्यावरुन सीबीआयकडे तपास सोपवावा हे गरजेचे नाही. या प्रकारामुळे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. काही लोक सुशांत प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. कुणीही उठावं आणि सीबीआय चौकशी लावावी असं झालं तर याला काही अर्थ नाही. देशाच्या संविधानालाच धक्का देणार का? अशी टीका शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपावर केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत