आज ६१६ रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५४४ रुग्णांची भर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज ६१६ रुग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५४४ रुग्णांची भर

 अहमदनगर: वेबटीम    जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे.  रुग्ण बरे होण्या...

 अहमदनगर: वेबटीम   

जिल्ह्यात आज ६१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२६३ झाली आहे.  रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६८.३५ टक्के इतकी आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२४६ इतकी झाली आहे. 


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ९३, अँटीजेन चाचणीत १७१ आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये  मनपा ३८, नगर ग्रामीण २५, कँटोन्मेंट ०२, पारनेर १८, अकोले ०५, कोपरगाव ०२, कर्जत ०१ आणि मिलिटरी हॉस्पीटल ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज १७१ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, संगमनेर १८, राहाता २७, पाथर्डी २९, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपुर २१, कॅन्टोन्मेंट ०१, श्रीगोंदा १८, पारनेर ०१, राहुरी ११, शेवगाव ०९,  कोपरगाव ०७, जामखेड ०७ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८० रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २३८, संगमनेर ०६, राहाता ०५, नगर ग्रामीण १६, कॅन्टोन्मेंट ०२, नेवासा ०१, पारनेर ०४, अकोले ०१, राहुरी ०१, शेवगाव ०२, कोपरगांव ०१, जामखेड ०१ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज एकूण ६१६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा ३००, संगमनेर २०, राहाता ६, पाथर्डी २४, नगर ग्रा.१८, श्रीरामपूर २६ , कॅन्टोन्मेंट २१, नेवासा १७,  राहुरी १९, श्रीगोंदा ३७, पारनेर ३८, अकोले २, शेवगाव ३३, कोपरगाव २०, जामखेड ७, कर्जत २७ आणि मिलिटरी हॉस्पीटल १ अशा रुग्णांचा समावेश आहे.


*बरे झालेले एकूण रुग्ण:७२६३*


*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२४६*


*मृत्यू: ११७*


*एकूण रूग्ण संख्या:१०६२६*


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत