माजी मंत्री अनिलभैया राठोड यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

माजी मंत्री अनिलभैया राठोड यांचे निधन

अहमदनगर : वेबटीम    राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घट...

अहमदनगर : वेबटीम   
राज्याचे माजी मंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांचे नुकतेच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या घटनेने तमाम शिवसैनिकामधून हळहळ व्यक्त केली जात आहे.       
शिवसेना उपनेते, माजी मंत्री व माजी आमदार अनिल राठोड (वय ७०) यांचे बुधवारी पहाटे ५.३० च्या दरम्यान खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा विक्रम, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
अनिल राठोड यांना काही दिवसांपूर्वी त्रास होऊ लागल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर उपचार सुरु असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले .
अनिल राठोड ‘भैया’ नावाने सर्वत्र प्रसिद्ध होत. भैया हे सलग ५ वेळा नगर शहर मतदार संघाचे आमदार व काही काळ मंत्री देखील होते. नगर शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या जडणघडणीत मोठा वाटा होता.    माजी आमदार अनिल राठोड यांनी नगरच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. जनतेने दिलेल्या संधीचे सोने करत त्यांना  शहरासह संपूर्ण मतदार संघात भरीव कामे केली आहेत, तसेच स्व राठोड यांच्यामुळे नगर हे एक सुरक्षित शहर समजले जात होते.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत