युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या समनव्यक पदी राजेंद्र बोरुडे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युवक काँग्रेस व एनएसयुआयच्या समनव्यक पदी राजेंद्र बोरुडे

 अहमदनगर : वेबटीम  युवक कॉंग्रेस व एनएसयूआयच्या राहाता व पाथर्डी व श्रीरामपूर तालुक्याच्या समन्वयकपदी राहूरी तालुक्यातील गुहा येथील राजू बो...

 अहमदनगर : वेबटीम 

युवक कॉंग्रेस व एनएसयूआयच्या राहाता व पाथर्डी व श्रीरामपूर तालुक्याच्या समन्वयकपदी राहूरी तालुक्यातील गुहा येथील राजू बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली.

नुकतीच नवनियुक्त समन्वयकांची ऑनलाईन मिटिंग प्रदेशाध्यक्ष श्री सत्यजित तांबे, जिल्हा निरीक्षक श्री अकिल पटेल, जिल्हा समन्वयक  श्री किरण काळे, जिल्हा कार्याध्यक्ष श्री सोमेश्वर दिवटे, राजू बोरुडे, स्मितल वाबळे, संदीप पुंड,देवेंद्र कडू पाटील,गोपाळ जोशी, राहुल उगले यांच्या उपस्थितीत पार पडली.  या बैठकीत राजू बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली

युवक कॉंग्रेस व एनएसयूआयच्या संघटना मजबूत करण्यासाठी तालुका निहाय दौरा करून तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, युवक कॉंग्रेस पदाधिकारी व इच्छुकांच्या भेटी घेऊन  रिक्‍त असणाऱ्या तालुक्यांमध्ये तालुकाध्यक्ष पदासाठी तीन नावांची शिफारस, तसेच तालुका कार्यकारणी मध्ये काम करण्यासठी इच्छुक असणाऱ्यांचे नावे  जिल्हा  समन्वयक  किरण काळे व कार्याध्यक्ष श्री सोमेश्वर दिवटे यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष श् सत्यजित तांबे यांच्याकडे देणार असल्याचे बोरुडे यांनी सांगितले.

 या निवडीचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, निरीक्षक अकिल पटेल, श्री सुरेश थोरात, समन्वयक  किरण काळे  आदींनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत