जामखेड : वेबटीम कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे . अद्याप कारण मात्र समजू शकले नाही . मृतदेह बाहेर काढण...
जामखेड : वेबटीम
कुसडगाव येथे एका महिलेसह तीन मुलींचा विहीरीत मृतदेह आढळून आला आहे . अद्याप कारण मात्र समजू शकले नाही . मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे . अत्तापर्यंन्त दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत
जामखेड तालुक्यातील कुसडगाव येथील भोगलवाडी शिवारात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एका महीलेस तीच्या तीन मुलींचा मृतदेह विहीरीतील पाण्यात अढळुन आला . मात्र घटना नेमकी कशा मुळे घडली हे अद्याप समजु शकले नाही . घटनेची माहिती मिळताच कुसडगाव येथील सरपंच हवा सरनोबत , पोलीस पाटील निलेश वाघ माजी पंचायत समिती सदस्य शरद कार्ले यांनी घटनास्थळी धाव घेतली . तसेच सदरची घटना तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना सांगितली या नंतर त्या दोघांनी देखील घटनास्थळी धाव घेतली . एक तासानंतर चारही मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहीरी बाहेर काढले . चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . आईसह तीन मुलींचे मृतदेह विहिरीत अढळुन आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत