राहुरी : वेबटीम तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह सुभाष पाटील यांचा काल खासदार सुजय विखे यांनी दबाव टाकून राजीनामा घेतल्याची वार्ता वा...
राहुरी : वेबटीम
तनपुरे कारखान्याचे चेअरमन उदयसिंह सुभाष पाटील यांचा काल खासदार सुजय विखे यांनी दबाव टाकून राजीनामा घेतल्याची वार्ता वांबोरी गावात येऊन धडकताच मोठा असंतोष उफाळून आला. अनेक ठिकाणी तरुण रस्त्यावर उतरले होते, मात्र उदयसिंह पाटील यांनी तत्काळ तिकडे धाव घेत आपल्यावर कुणीही दबाव आणला नाही, गैरसमज करून घेऊ नका, आपण स्वतः राजीनामा दिला आहे, त्यामुळे असे चुकीची कामे करू नका, अशी विंनती केल्यानंतर हे प्रकरण शमले,
दरम्यान, काही वेळाने माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी स्वतः उदयसिंह पाटील यांनी पुढाकार घेत आंदोलन केले. याचं झालं असं की, गेल्या चार वर्षांपासून उदयसिंह पाटील हे तनपुरे कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत कारखाना सुरू ठेवला. चांगले गाळप करण्यासाठी प्रयत्न केले, कामगार, शेतकऱ्यांचे हित जोपासले, असे असताना त्यांचा विखे यांनी राजीनामा घेतल्याची बाब कानावर पडताच वांबोरीत संताप व्यक्त होऊ लागला होता. अनेक तरुण रस्त्यावर एकत्र आले होते, कुठं घोषणाही सुरू झाल्या होत्या, मात्र हे उदयसिंह पाटील यांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेतली, यावेळी कार्यकर्त्यांची समजूत काढत आपल्यावर कुणीही दबाव टाकला नाही, आपण स्वतः राजीनामा दिला आहे, त्यामुळे गैरसमज करून घेऊ नका, यापुढेही आपल्याला माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनात काम करायचे आहे. असे आवाहन केल्यानन्तर वांबोरी तूर्त तरी शांत झाली आहे. दरम्यान, काही वेळाने उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दर आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, यासाठी नियमात आंदोलन करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत