गुड न्यूज ; मुळा धरणात आवक वाढली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गुड न्यूज ; मुळा धरणात आवक वाढली

राहुरी : वेबटीम    मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आज बुधवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणाकडे आ...

राहुरी : वेबटीम 
 
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आज बुधवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणाकडे आज सायंकाळी कोतूळ कडील लहित खुर्द येथील मुळा नदी दुथडी भरून व्हायला सुरुवात झाली. आज बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी लहित खुर्द येथे मुळानदी तीन मीटरला ७ हजार क्यूसेकने वहात होती.
 मागील वर्षी एक ऑगस्ट रोजी धरण निम्मे भरले होते . आज सकाळी धरणाचा पाणीसाठा १२ हजार  ३०० दशलक्ष घनफूट इतका होता , तर धरणा कडे १ हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती . यंदा देखील मुळा धरण भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अण्णासाहेब आंधळे शाखा अभियंता सायली पाटील व अन्य अधिकारी , कर्मचारी पाणी पातळी इकडे लक्ष देऊन आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत