श्रीराम नामाने उंबरे नगरी दुमदुमली ; गावात एकच जल्लोष - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीराम नामाने उंबरे नगरी दुमदुमली ; गावात एकच जल्लोष

   उंबरे ः वेबटीम     संपूर्ण देशभर आज आनंदोत्सव साजरा होत असताना उंबरे येथेही हिंदूधर्मप्रचारक ह.भ.प. आदिनाथ महाराज दुशिंग व भागवताचार्य ह...

   उंबरे ः वेबटीम   
 संपूर्ण देशभर आज आनंदोत्सव साजरा होत असताना उंबरे येथेही हिंदूधर्मप्रचारक ह.भ.प. आदिनाथ महाराज दुशिंग व भागवताचार्य ह.भ.प बाळासाहेब महाराज डेंगळे यांच्या अधिपत्यात राम मंदीर शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हनुमान मंदीरात भजन होवून ग्रामप्रदिक्षणा घालण्यात आली. यावेळी प्रभु श्रीरामांच्या नामजपाने संपूर्ण परिसरातील वातावरण रामभक्तीत न्हावून निघाले होते. तर गावात सोशल डिस्टन्सींगचे पालन करत अयोध्येत झालेल्या श्रीराम मंदीराच्या शुभारंभाचे उंबरेतही फटाके फोडून स्वागत करण्यात आले. 
प्रारंभी गावातील हनुमान मंदीरात श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच हनुमान मुर्तीची विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी ह.भ.प बाळासाहेब महाराज डेंगळे यांच्यासह बन्सीदादा क्षीरसागर, विठ्ठल मिस्तरी बारवेकर, भाऊसाहेब शेजूळ, नवनाथ ढोकणे, बाबुराव गायकवाड, दादासाहेब ढोकणे, राजेंद्र उंडे, सोपानकाका दुशिंग, रविनाना ढोकणे,संतोष ढोकणे, बबन क्षीरसागर, रामभाऊ क्षीरसागर, सुदाम टेलर, रामभाऊ ढोकणे, सोपान हापसे आदी भाविक उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी आदिनाथ महाराज दुशिंग यांनी सोशल डिस्टन्सींगचे पालन करत या सोहळ्याचे उत्कृष्ठ नियोजन केले. शिपाई राजेंद्र काळे यांनी याकामी चोख बंदोबस्त बजावला. तर तरूण वर्गाने यामध्ये सहभाग घेत सोहळ्याची शोभा वाढवली.  सामाजिक कार्ययकर्ते  आपासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत