देवळाली ः वेबटीम देवळाली प्रवरात व राहुरी फक्टरी परिसरात आठवडाभरात दुखाचा जणू डोंगर कोसळला आहे. एका डॉक्टरांच्या निधनानंतर एका तरूणाचा विह...
देवळाली प्रवरात व राहुरी फक्टरी परिसरात आठवडाभरात दुखाचा जणू डोंगर कोसळला आहे. एका डॉक्टरांच्या निधनानंतर एका तरूणाचा विहीरीत बडुन मृत्यू झाला. त्यानंतर 24 तासात दोन जणांनी गळफास घेतल्याचीही घटना घडली. अशाप्रकारे काही दिवसातच देवळालीतील तीन तरूणांचा मृत्यू झाल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
देवळाली प्रवरा हे शहर शांत व येथील लोकं देखील संयमी आहेत. मात्र गेल्या आठवड्यापासून देवळालीवर दुखाचे सावट आहे. देवळालीकरांसाठी ऑगस्ट महिना काहीसा शोकसागरात बुडविणारा ठरला आहे. काही दिवसापूर्वी पोहण्यासाठी गेलेल्या अक्षय ढूस याचा विहीरीत बडुन दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे देवळालीतून हळहळ व्यक्त केली जात होती. ती घटना देवळालीकर विसरत नाही, तेच संतोष रवींद्र वरघुडे याने गळफास घेवून जीवनयात्रा संपवली, त्यामुळे आणखी एक तरूण गेल्याची भावना देवळालीकर व्यक्त करत असतानाच आज पुन्हा राहुरी कारखाना येथील मनोज बोर्हाडे या युवकाने गळफास घेतल्याने मोठा धक्का बसला आहे. आठवडाभरात तीन तरूणांचा मृत्यू झाल्याने देवळालीकर मोठी हळहळ व्यक्त करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत