संगमनेर ः वेबटीम एका तरूणाने वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्यावर वर्षभर अत्याचार केल्याची पिडीत महिलेने पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोल...
संगमनेर ः वेबटीम
एका तरूणाने वेगवेगळी आमिषे दाखवून आपल्यावर वर्षभर अत्याचार केल्याची पिडीत महिलेने पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, गुंजाळवाडी शिवारातील निलेश नंदकुमार देशमुख या विवाहित तरुणाचे खांडगाव शिवारातील 28 वर्षीय विवाहित तरुणीशी सूत जुळले होते. त्यानंतर त्यांनी ‘लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2019 पासून ते 18 ऑगस्ट पर्यंत वर्षभर ते दोघेही एकत्रित राहत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले. मात्र मंगळवारी रात्री त्या महिलेने तडक शहर पोलिस ठाणे गाठत देशमुख याने गेल्या वर्षभरात आपल्याला विविध प्रलोभनं दाखवित व खोटी आश्वासने देत वारंवार आपल्या मनाविरुद्ध शारीरिक अत्याचार केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली.
याबाबत त्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादिवरून नीलेश देशमुख याच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत