शेतकऱ्यांना खुशखबर ; 'या' वर्षीचा रखडलेला पीकविमा बँकेत वर्ग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शेतकऱ्यांना खुशखबर ; 'या' वर्षीचा रखडलेला पीकविमा बँकेत वर्ग

नगर : वेबटीम पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 2019- 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पिक विमा तांत्रिक कारणांमुळे रखडलेला ...

नगर : वेबटीम पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 2019- 20 या हंगामाचा खरीप पिकांच्या पिक विमा तांत्रिक कारणांमुळे रखडलेला होता.अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या व्यथा थेट केंद्रीय कृषी कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांची मागील आठवड्यात नवी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्या त्यांच्यासमोर खासदार डॉक्टर सुजय विखे व अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक व माजी आमदार कर्डिले यांनी भेटून मांडल्या आणि यासंबंधीचे निवेदन दिले. त्यावेळेस कृषिमंत्र्यांनी संबंधित पिक विमा कंपनीला तातडीने सूचना दिल्या. पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात साडेबारा हजार रुपये पर्यंतचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेचे योजना च्या अंतर्गत 2019 - 20 वर्षातील खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा झाल्याने खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांचे शेतकर्‍यांच्या वतीने आभार व्यक्त केले. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड १५लाख२५ हजार, कर्जत ९ कोटी ७९ हजार, शेवगाव १० कोटी ७४ लाख ६८ हजार, पाथर्डी १ कोटी ५१ लाख ३५ हजार, श्रीगोंदा ३ लाख ५६ हजार, पारनेर ६० हजार, राहुरी ३ कोटी८३ लाख ३० हजार रुपये संबंधित तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप हंगामातील कपाशी आणि तूर या पिकासाठी पैसे जमा करण्यात आले आहे, अशी माहिती श्री पवळे यांनी दिली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत