उंबरे : वेबटीम डाॅ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित चेअरमन मा श्री. नामदेवराव पांडुरंग ढोकणे पाटील यांची निवड झाली याबद्...
उंबरे : वेबटीम

डाॅ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना नवनिर्वाचित चेअरमन मा श्री. नामदेवराव पांडुरंग ढोकणे पाटील यांची निवड झाली याबद्दल व उंबरे गावाचे भूषण हभप आदिनाथ महाराज उंबरेकर यांची राष्ट्रीय भागवतधर्म परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल ग्लोबल स्कूलचे संस्थापक प्रा डॉ श्री रामकिसन ढोकणे सर, भाजप तालुका उपाध्यक्ष श्री ज्ञानदेव क्षीरसागर माऊली, पत्रकार श्री गोरक्षनाथ शेजुळ, श्री सीताराम ढोकणे सर, श्री भाऊसाहेब दुशिंग, श्री जगन्नाथ ढोकणे, श्री गणेश दुशिंग, श्री कैलास खंडागळे, श्री अर्जुन हापसे पाटील यांच्या उपस्थित त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी हभप आदिनाथ महाराज म्हणाले की, आज उंबरे गावासाठी सोनियाचा दिवस आहे.राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात योगदान असलेल्या ढोकणे कुटुंबातील नामभाऊ ढोकणे यांची कारखाना अध्यक्षपदी निवड झाली आहे, आम्हा ग्रामस्थांना याचा खूप अभिमान आहे, तर ग्लोबल स्कुलचे प्रा रामकृष्ण ढोकणे सर म्हणाले, नामभाऊ ढोकणे यांना 25 वर्षांच्या सहकारातील तपचर्येचे आज फळ मिळाले आहे. त्यांचा हा सन्मान सम्पूर्ण उंबरे गावाचा सन्मान आहे, त्यांचे कार्य आम्हा तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल

. भाजप तालुका उपाध्यक्ष माऊली क्षीरसागर म्हणाले, उंबरे गावातील ढोकणे कुटुंबाचे तालुक्याच्या विकासात मोठे योगदान आहे. नामभाऊ ढोकणे यांना सहकाराचा तगडा अनुभव आहे, त्यांना चेअरमन पदाच्या मिळालेल्या संधीचे ते नक्कीच सोने करतील, असा विश्वास व्यक्त करून त्यांची राजकारणात आणखी प्रगती व्होओ, अशी शुभेच्छा दिली, यावेळी नामभाऊ ढोकणे यांनी आदिनाथ महाराज दुशिंग यांचा सत्कार करत माझ्याकडे सर्वांना सन्मानाची वागणूक मिळेल, कारखाना आपल्याला चांगला चालवायचा आहे, सर्व शेतकऱ्यांनी ऊस गाळप करावा, असे आवाहन केले. छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने गोरक्षनाथ शेजुळ यांनी आभार व्यक्त केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत