राहुरी : वेबटीम मुळा धरणात आज मंगळवारी (ता. १८) सकाळी सहा वाजता लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून 5,400 क्युसेकने नवीन पाण्याची आव...
राहुरी : वेबटीम

मुळा धरणात आज मंगळवारी (ता. १८) सकाळी सहा वाजता लहित खुर्द (कोतुळ) येथे मुळा नदीपात्रातून 5,400 क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचा पाणीसाठा 19,200 दशलक्ष घनफूट (74 टक्के) झाला आहे. त्यामुळे धरण भरण्याची आशा उंचावली आहे.

राहुरीसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांसाठी मुळा धरण एक वरदान ठरलेले आहे. दरवर्षीबया धरणातील पाणी साठ्यावर शेतीचे गणिते अवलंबून असतात, गेल्या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने धरण भरले होते, यंदा देखील चांगला पाऊस सुरू असल्याने धरण भरण्याची आशा वाढली आहे, आज सकाळी धरणात 5400 कुसेक्सने आवक सुरू आहे तर पाणीसाठा 20 हजाराच्या दिशेने आगेकूच करत आहे,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत