पार्थ पवार भाजपच्या वाटेवर, पण ....! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पार्थ पवार भाजपच्या वाटेवर, पण ....!

पुणे : वेबटीम आजोबा शरद पवार यांनी खडसवाल्यानंतर पार्थ पवार चांगलेच नाराज झाले. पार्थ पवार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याच्य...

पुणे : वेबटीम आजोबा शरद पवार यांनी खडसवाल्यानंतर पार्थ पवार चांगलेच नाराज झाले. पार्थ पवार येत्या काही दिवसात मोठा निर्णय घेणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पार्थ पवार यांच्या या नाराजीबाबत आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. पार्थ पवार भाजपमध्ये येणार असले, तरी आम्ही घेणार नाही, असं वक्तव्य भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं आहे. पार्थ पवार भाजपमध्ये येत नाहीत आणि आम्ही त्यांना घेणारही नाही. पुण्यातील एका कार्यक्रमात गिरीश बापट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. जय श्रीराम फक्त पार्थ नाही, तर संपूर्ण जग म्हणतं, असंही गिरीश बापट म्हणाले आहेत. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मागणीला आम्ही काडीचीही किंमत देत नाही, असं शरद पवार जाहीरपणे म्हणाले. शरद पवार यांच्या या वक्तव्याचे पडसाद पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीमध्येही उमटले. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर पार्थ पवारांनी पवार कुटुंबातल्या व्यक्तींच्या भेटीगाठीही घेतल्या. सुशांतसिंग राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी पार्थ पवार यांनी केली होती. या मागणीचं पत्र पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. याचसोबत अयोध्येत श्रीराम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा देणारं पत्रही पार्थ पवार यांनी ट्विटरवर शेयर केलं होतं. जय श्रीराम म्हणत पार्थ पवारांनी या पत्राची सुरुवात केली होती. पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये घेतलेल्या या भूमिकांमुळे शरद पवार चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी मीडियासमोरच आपला नातू आणि अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना खडसावलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत