राहुरी: वेबटीम डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील ढोकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय आसाराम ढूस यां...
राहुरी: वेबटीम
डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नामदेव पाटील ढोकणे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रेय आसाराम ढूस यांची बिनविरोध निवड झाली .स्वीकृत संचालक पदी राहुरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सुभाष आप्पासाहेब वराळे यांची निवड झाली. फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी आनंद व्यक्त केला. 
कारखाना अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दिलेले राजीनामे मंजूर झाल्याने रीक्त पदावर ही निवड झाली. कारखान्याच्या सभागृहात संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत ही निवड झाली .अध्यक्षपदाच्या नावाची सूचना मावळते अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी मांडली त्यास मावळते उपाध्यक्ष श्यामराव निमसे यांनी अनुमोदन दिले उपाध्यक्ष पदाच्या नावाचे सूचना महेश पाटील यांनी मांडली.त्यास अशोक खुरुद यांनी अनुमोदन दिले . अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रादेशिक साखर संचालक राजेंद्र कुमार जोशी होते बैठकीस कारखान्याचे मार्गदर्शक व तज्ञ संचालक खासदार डॉ.सुजय विखे पाटील, बाळकृष्ण कोळसे, मच्छिंद्र तांबे ,केशव कोळसे ,उत्तम आढाव ,मधुकर पवार ,रविंद्र म्हसे, भारत तारडे, शिवाजी गाडे, सुरसिंग पवार अर्जुन बाचकर,पार्वतीबाई तारडे,विजय डौले, मधुकर पवार, नंदकुमार डोळस, हिराबाई चौधरी,प्रभारी कार्यकारी संचालक भाऊसाहेब सरोदे आदी उपस्थित होते अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी एकेकच अर्ज दाखल झाले त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले .स्वीकृत संचालक पदाच्या एका जागेसाठी सुभाष वराळे यांची बिनविरोध निवड झाली .निवडीनंतर मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे हस्ते,विविध व्यक्तीव संस्थांचे वतीने पदाधिकाऱ्यांचे सत्कार झाले. दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्ट तनपुरे यांनी देखील ढोकणे यांचा सन्मान केला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत