मुळा धरणात आज किती आहे आवक ? जाणून घ्या लगेच - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मुळा धरणात आज किती आहे आवक ? जाणून घ्या लगेच

राहुरी : वेबटीम  मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पावसाचा जोर ओसरल्याने सकाळी 6 वाजता कोतुळ कडील मुळानदी पावणेचार मीटरला 6 हजार क्‍युसे...

राहुरी : वेबटीम 
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल पावसाचा जोर ओसरल्याने सकाळी 6 वाजता कोतुळ कडील मुळानदी पावणेचार मीटरला 6 हजार क्‍युसेकने सुरू होती.  मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी  ची प्रतीक्षा होती .  त्यामुळे चार पाच दिवसापासून या क्षेत्रात हरिश्चंद्रगड भागांमध्ये पावसाची जोरदार सुरुवात झाली .  काल सकाळी धरणाकडे 11 हजार क्यूसेकने आवक सुरू होती, सायंकाळी वाढून 14 हजार क्यूसेक झाली तर आज सकाळी कमी होऊन ती 6 हजार क्यूसेकने सुरू आहे. सकाळी मुळा धरण साठा १8500  वर पोहोचला आहे .  गेल्या २४ तासात 750   दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली  असून पाणीसाठयामध्ये दोन दिवसांत झपाट्याने वाढ होणार आहे .  धरण साठा उद्यापर्यंत 75%  च्या पुढे सरकेल ,   मुळा धरणामध्ये पाण्याची आवक वाढल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत