धोनीने का केली निवृत्तीची घोषणा ; वाचा पडद्यामागची कारणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

धोनीने का केली निवृत्तीची घोषणा ; वाचा पडद्यामागची कारणे

चेन्नई: वेबटीम मै पल दो पल का शायर हूँ... अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कभी-कभी' या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी ...

चेन्नई: वेबटीम मै पल दो पल का शायर हूँ... अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या 'कभी-कभी' या चित्रपटातील साहिर लुधियानवी यांनी लिहलेले आणि मुकेश यांनी गायलेले या गाण्यासह भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याने २००४ ते २०१९ पर्यंतचे सर्व क्षण एका व्हिडियोत टाकले आणि निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या मैदानावरील निर्णयांप्रमाणेच निवृत्तीचा निर्णय देखील कोणाला कळाली नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना धोनीने हे देखील स्पष्ट केले की तो युवा खेळाडूंच्या मार्गात अडथळा ठरणार नाही. जर धोनीने निवृत्ती घेतली नसती तर ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन सारख्या युवा खेळाडूंवर आयपीएलमध्ये अधिक चांगली कामगिरी करण्याचा दबाव वाढला असता. या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कप होणार होता. यासाठी धोनी तयारी देखील करत होता. पण करोना व्हायरसमुळे वर्ल्ड कप पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे हे निश्चित झाले की संघात विकेटकिपर म्हणून पंतला सर्वात आधी संधी मिळाली असती. धोनी आणि चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांचे जवळचे नाते आहे. २०१९ साली न्यूझीलंडविरुद्ध सेमीफानल मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर धोनीने एकही सामना खेळला नाही. तेव्हापासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू होती. रांचीहून धोनी शुक्रवारी चेन्नईत दाखल झाला. चेन्नई संघातील सहकाऱ्यांची भेट झाल्यानंतर धोनीने श्रीनिवासन यांची भेट घेतली आणि शनिवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत