राहुरी : वेबटीम मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज सायंकाळी 14 हजार 300 क्युसेकने आवक सुरू होती. धरणात 18 हजार 200 ...
राहुरी : वेबटीम
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून आज सायंकाळी 14 हजार 300 क्युसेकने आवक सुरू होती. धरणात 18 हजार 200 दलघफु पाणीसाठा झाला आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टीची प्रतीक्षा होती. त्यामुळे कालपासून या क्षेत्रात हरिश्चंद्रगड भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली . काल सकाळी धरणाकडे 11 हजार क्यूसेकने आवक सुरू होती , सायंकाळी त्यात वाढ होऊन 14 हजार क्यूसेक झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत