जिल्ह्यातील 'हे' धरण ओव्हर फ्लो; नदीपात्रात सोडले पाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यातील 'हे' धरण ओव्हर फ्लो; नदीपात्रात सोडले पाणी

अकोले : वेबटीम।  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणातील प...

अकोले : वेबटीम।  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरू आहे. धरणातील पाणीपातळी वाढली आहे. 11 टीएमसी क्षमतेच्या हे धरण तांत्रिक दृष्ठ्या भरले आहे. पाऊस सतत सुरू असल्याने धरणातील पाणी पातळी राखण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पाणी सोडले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता ग. भा. नान्नोर यांनी दिला आहे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच स्वतःच्या सुरक्षेसह वीज मोटारी, इंजिन, शेती अवजारे व पशुधनाच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 12 ऑगस्टपासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे. शनिवारी (15 ऑगस्ट) सकाळी 6 वाजता धरणाची पाणीपातळी 942 मीटर झाल्याने व पाणीसाठा 9606 दशलक्ष घनमीटर (9.60 टीएमसी) झाल्याने तसेच पावसाची संततधार सुरूच असल्याने प्रवरा नदीपात्रात 835 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले गेले. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणाच्या सांडव्यातूनही पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठची गावे, वस्त्या, वाड्यांतील नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी, कोणीही नदीपात्रात जाऊ नये तसेच पात्रातील वीज मोटारी, इंजिन तसेच शेती अवजारांसह पशुधनांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन जलसंपदा विभागाद्वारे करण्यात आले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत