श्रीरामपूर ः वेबटीम श्रीरामपुर रस्त्यावरील असलेल्या रेल्वेच्या यशवंतबाबा चौकी येथिल भुयारी मार्गावर सुमारे चार ते पाच फुट ऊंचीवर पावसाचे...
श्रीरामपूर ः वेबटीम
श्रीरामपुर रस्त्यावरील असलेल्या रेल्वेच्या यशवंतबाबा चौकी येथिल भुयारी मार्गावर सुमारे चार ते पाच फुट ऊंचीवर पावसाचे पाणी साचल्याने सुमारे ४५ते ५० मेंढ्याचा पालक असलेल्या मेंढपाळने जनावरे रेल्वे रस्ता ओलंडण्यासाठी रेल्वे रुळ वरुण नेत असतांना डब्बे विरहित असलेले भरधाव इंजिन सुमारे ४० मेंढ्याना जोराची धड़क देत पुढे गेले यात ४० मेंढ्या मृत झाल्या आहेत.
भुयारी मार्गात पाणी नसते तर त्याच मेंढ्या रुळावरुण न जाता भुयारी मार्गातून गेल्या असत्या व त्यांचे प्राण वाचले असते त्यामुळे अकार्यक्षम असलेल्या रेल्वे प्रशाशनाच्या चुकिने हा दुर्दैवी अपघात घडला असुन यास रेल्वे प्रशाशन जबाबदार आहेही घटना सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असताना गरीब मेंढपाळ आपला उदारनिर्वाह व ज्यांच्या अन्नपाण्यासाठी घर दार सोडून बाहेर पडलो असे कुटुंबातील अनेक मुके सदस्य अचानक डोळ्यादेखत मृत झाले.असे असताना सायंकाळी अंधार पड़ताच यातील गर्भधारण केलेल्या मेंढ्या व्यतिरिक्त इतर मेंढ्या रहस्यमयरित्या अचानक तेथून गायब झाल्या ?? मात्र याच अंधारात एक चार चाकी वाहनातुन काही मृत मेंढ्या चौकीलगतहुन अज्ञात कोणी तरी नेल्याचे माहिती समजते या मृत मेंढ्या नेमक्या कश्यासाठी व कोणी नेल्या हे मात्र समजू शकले नाही मेंढपाळ हा लासलगांव परिसरातील असल्याची माहिती समजते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत