कर्डिले साहेब, गाय घ्यायची आहे शेळी नाही ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्डिले साहेब, गाय घ्यायची आहे शेळी नाही !

  राहुरी ः वेबटीम  जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी शेतकर्‍यांना प्रती गायीसाठी 15 हजारांचे कर्ज देण्याची 56 इंची ...

  राहुरी ः वेबटीम 

जिल्हा बँकेच्या माध्यमातून माजी आ. शिवाजीराव कर्डिले यांनी शेतकर्‍यांना प्रती गायीसाठी 15 हजारांचे कर्ज देण्याची 56 इंची छाती फुगवून घोषणा केली खरी मात्र साहेब, 15 हजारात तुम्हीच गाय घेवून दाखवा, असे आव्हान आता उंबरे येथील शेतकर्‍यांमधून केले जात आहे. सध्या शेतमालाला हमीभाव नाही, दुधाला दर नाही, त्यामुळे शेतकर्‍यांकडे पैसे नाही, जिल्हा बँकेकडून आपण 15 हजार रुपये देणार आहात, त्यात साधारणतः दोन शेळी खरेदी करता येईल , गाय नाही. 

 जिल्हा बँकेतून शेतकर्‍यांना प्रतिगाय 15 हजार रुपये प्रमाणे 10 गायींसाठी दिड लाख रुपये कर्ज मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवा, असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले आहे. या आवाहनानंतर शेतकर्‍यांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राहुरी तालुक्यातूनही याबाबत शेतकरी बोलते झाले आहेत. एक गाय घ्यायला किमान 70 हजार रुपये लागतात. त्यामुळे कर्डिले साहेब, तुम्ही दूध धंदा करत असलेल्या काळातील जनावरांच्या किमंतीत आता बदल झाल्याचे अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कर्डिले साहेब, शेतकर्‍यांना दिड लाख रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय बदलून किमान 5 लाख रुपये कर्ज द्या, त्यात चांगल्या 6-7 गायी तरी येतील, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत