सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वजन वाढणे ही समस्या सामान्य आहे. पण वजन वाढल्याने काही जण अक्षरशः त्रासले आहेत.वाढत्या वजनाच्या समस्येमुळे ...
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात वजन वाढणे ही समस्या सामान्य आहे. पण वजन वाढल्याने काही जण अक्षरशः त्रासले आहेत.वाढत्या वजनाच्या समस्येमुळे कोलेस्ट्रॉल, मधुमेह याव्यतिरिक्त कंबर आणि पोटावरही चरबी वाढू लागते. यामुळे आपल्या फिटनेसमध्ये बाधा निर्माण होते. वाढलेले वजन नियंत्रणात आणण्यासाठी लोक विविध उपचार पद्धती अवलंबतात. काही लोक डिटॉक्स ड्रिंक, जिऱ्याचे पाणी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पेयाचे सेवन करतात.पण हे उपचार योग्य पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच होणे आवश्यक आहे. असे म्हणतात की चहा प्यायल्याने आपल्या शरीराला आराम मिळतो. पण अति प्रमाणात चहा प्यायल्याने आरोग्यास नुकसान पोहोचू शकतात. चहाऐवजी तुम्ही आहारामध्ये ओवा, काळे जिरे, आले आणि मेथी दाण्यांच्या चहाचा समावेश करा. योग्य प्रमाणात हे ड्रिंक प्यायल्यास तुमचे वजन हळूहळू कमी होण्यास मदत मिळेल.
चहा तयार करण्यासाठी लागणारी सामग्री२५० ग्रॅम मेथी, १०० ग्रॅम ओवा
१०० ग्रॅम काळे जिरे, तीन मोठे चमचे सूंठ
दोन मोठे चमचे हिंग
चहा पावडर तयार करण्याची पद्धत
एका पॅनमध्ये मेथीचे दाणे भाजून घ्या. मेथीच्या दाण्यांचा सुगंध येईपर्यंत दाणे फ्राय करत राहा. यानंतर ओवा आणि काळे जिरे देखील वेगवेगळे भाजून घ्या. आता मेथीचे दाणे, ओवा आणि काळे जिरे एकत्र करा. यामध्ये सूंठ आणि हिंग मिक्स करा. ही सर्व सामग्री मिक्सरमध्ये वाटा आणि त्याची पावडर तयार करून घ्या. ही पेस्ट एका हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवा. हा डबा कोरड्या जागेवर ठेवावा.
कसा तयार करायचा चहा?
नेहमीच्या चहाऐवजी तुम्ही हा आरोग्यवर्धक चहा पिऊ शकता. एका ग्लास पाण्यामध्ये एक चमचा पावडर मिक्स करा. हे पाणी थोड्या वेळासाठी उकळा. त्यामध्ये चवीनुसार गूळ मिक्स करा. चहा उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि कपमध्ये गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास हा चहा गरम किंवा थंड करून पिऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी मेथी फायदेशीर
मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. योग्य प्रमाणात मेथीचे सेवन केले तर पचनाशी संबंधित समस्या कमी होण्यास मदत मिळेल. यातील औषधी गुणधर्मामुळे शरीर डिटॉक्स होईल. यामुळे शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होणार नाही. पाण्यामध्ये भिजवलेली मेथी, मेथीची चहा आणि कडधान्यांसह मेथी खाल्ल्यास तुम्हाला आरोग्यदायी लाभ मिळतील.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत