राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज एकाच दिवशी तांभेरे येथे 13 रुग्ण बाधित आढळले आहेत तर वांबोरीतही पुन्हा दोन...
राहुरी तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच असून आज एकाच दिवशी तांभेरे येथे 13 रुग्ण बाधित आढळले आहेत तर वांबोरीतही पुन्हा दोन नवे रुग्ण, मुसळवाडीत 1, असे आज एकूण 16 रुग्ण सापडल्याने प्रशासनाची धावपळ वाढली आहे.
तांभेरे येथे एक म हिला पॉझिटिव्ह आढळल्यानंतर प्रशासनाने याठिकाणी रॅपीड टेस्ट सुरू केल्या होत्या. आज दिवसभरात तब्बल 100 जणांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्या पैकी 13 जण बाधित आढळल्याने त्यांना तातडीने राहुरी कृषि विद्यापीठातील केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे. तसेच वांबोरीतही दोन रुग्ण आढळले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, राहुरी त ालुक्यात तहसीलदार शेख साहेब, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख साहेब तसेच आरोग्य अधिकारी डॉ. नलिनी विखे हे कोरोनाच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. रुग्ण सापडलेल्या ठिकाणी तत्काळ उपाययोजना करण्याचे काम प्रशासनाच्या माध्यमातून केले जात आहे. याशिवाय काही ठिकाणी कन्टेन्मेंट झोन जाहीर करून त्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला जात आहे. त्यास जनतेमधूनही चांगला प्रतिसाद दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत