उंबरे : वेबटीम
उंबरे : वेबटीम
सध्याच्या कोरोना संकटामुळे गणेशोत्सव साजरा करताना प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करत उंबरे गावाने एक गाव एक गणपती असा उपक्रम राबवून तालुक्याला आदर्श घालून दिला आहे.उद्यापासून सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला अनुसरून उंबरे ग्रामस्थांच्या सूचनेनुसार यंदा एक गाव एक गणपती ही संकल्पना उंबरेकर राबविणार आहे. या संदर्भात मार्गदर्शन करताना राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उंबरे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत त्यांनी सर्वांना मार्गदर्शन केले व एक गाव एक गणपती संकल्पना यासाठी आवाहन केले. त्याला संपूर्ण ऊंबरेकर यांनी प्रतिसाद दिला आहे. या बैठकीसाठी तनपुरे सहकारी साखर कारखाना माजी संचालक सुनील अडसुरे , राहुरी तालुका शिवसेना प्रमुख विजय ढोकणे, सरपंच राजेंद्र ढोकणे, पोलीस पाटील गोरक्षनाथ देव्हारे, शिवसेना उपप्रमुख कैलास अडसुरे, युवानेते सजय अडसुरे, पत्रकार लक्ष्मण पटारे, जालिंदर ढोकणे, गंगाधर अडसुरे व गावातील सर्व मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते। ग्रामस्थांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे....
दरम्यान, उंबरे तरुणांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना डॉ रामकीसन ढोकणे म्हणाले की, याबद्दल सर्वप्रथम सर्व तरुण मंडळाला या कार्यासाठी शुभेच्छा देतो... मी नेहमी सांगत असतो की माझ्या गावामध्ये फार मोठा तरुण वर्ग आहे, तो किती आहे हे जर कुणाला पहायचे असेल तर त्याचा प्रत्यय गणपती विसर्जनाच्या दिवशी येतो. या दिवशी सदर तरुण वर्गामध्ये खूप मोठा उत्साह दिसून येतो.असो... युवकांनी, तरुणांनी आपल्यातील ऊर्जा अशीच तेवत ठेवावी व स्वतः करत असलेल्या उदयोग व्यवसायमध्ये आपला ठसा उमठावा यासाठी शुभेच्छा...मी तसे पाहिले तर फार कमी युवकांना ओळखतो कारण माझे बालGपण व शिक्षण गावामध्ये झाले नाही, तसं मला तुम्हाला सल्ला देण्याचा काही अधिकार नाही तरी पण एक सल्ला देईल.. की तुम्ही जीवनात किमान एवढा तरी संघर्ष करा की तुमच्या स्वतःच्या मुलाने/मुलीने तुमच्यामध्येच आदर्श शोधला पाहिजे... त्यासाठी तरुणांनी नेहमी चांगली संगत ठेवावी. काही चांगले झाले नाही तरी चालेल पण वाईट नक्कीच होणार नाही असा विश्वास वाटतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत