राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्यात आज तब्बल 19 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल आणि आज या दोन दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 42 इतका झ...
राहुरी ः वेबटीम
राहुरी तालुक्यात आज तब्बल 19 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काल आणि आज या दोन दिवसात कोरोना बाधितांचा आकडा 42 इतका झाला आहे. शहरातील जोगेश्वरी आखाडा व शहर परिसरात 7 रूग्ण, देसवंडी 2 रूग्ण, टाकळीमिया 1, कोल्हार खुर्द 6, देवळाली प्रवरा 3, चिखलठाण,मुसळवाडी व सोनगाव प्रत्येकी 1 असे एकूण 22 रूग्ण वाढले होते. त्यानंतर शनिवारी दुसर्या दिवशीही 19 रूग्णांची वाढ झाली. यामध्ये कोल्हार खुर्द येथे तब्बल 12 रूग्णांची वाढ झाली. गणेगाव, बारागाव नांदूर, राहुरी शहर, पाथरे, चांदेगाव, वाघाचा आखाडा येथे प्रत्येकी 1 असे एकूण 19 रूग्ण वाढले. याप्रमाणे राहुरी तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या त्रिशतकी मजल मारणार असल्याचे चित्र आहे. बाधितांचा आकडा 298 इतका झाला आहे. त्यापैकी 211 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 77 रूग्णांवर उपचार सुरू आहे. 11 जणांचा मृत्यु
कोणत्याही टिप्पण्या नाहीत