कोंढवड राहुरी तालुक्यातील शीलेगावं परिसरातील करपरा वाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यात एक शेळी गंभीर ज...
कोंढवड
राहुरी तालुक्यातील शीलेगावं परिसरातील करपरा वाडी येथे बिबट्याने हल्ला केल्याने दहशत निर्माण झाली आहे. या हल्ल्यात एक शेळी गंभीर जखमी झाली आहे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी आखिल भारतीय छावा मराठा सघटनेचे रमेश पाटील म्हसे यांनी मागणी केली आहे.तीन महिन्यांपासून बिपट्याने शिलेगावं परिसरातील करपवडी येथे धुमाकूळ घातला असून शेतकऱ्याच्या पशुधन या वर हल्ला करत आणेक शेळी व बोकड ठार केल्या आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला आनेकदा पिंजरा मागणी करून ही वन विभागाने या घटनेचा गभिर्याने विचार न करता सतत काना डोळा केला आहे या मुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत आहे. आनेक शेतकरी बिबट्याच्या दहशतीने रात्र जागून आपली पशुधनाची रक्षण करीत आहे त्या काल पासून बिबट्याने पुन्हा हल्ला केल्याने व बिबट्याचा परिसरात वावर असल्याने शेतकरी वर्ग शेतीच्या कामासाठी शेतात जाण्यास धजवत नाही. तसेत शेतात ऊस , गिन्नी गवत ,करपारा नदीत येड्या बाभळी चे साम्राज्य असल्याने बिबट्याचे दिवसा ढवळ्या दर्शन होत आहे.तरी या भागात वन विभागाने तत्काळ पिंजरा लाऊन बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास कोणती ही पूर्व सूचना न देता वन विभागाच्या विरोधात आंदोलना चा ईशारा म्हसे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत