देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव) कोरोना संकटामुळे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून बंद असलेला देवळाली प्रवरा येथील शासनाच्या नियमानुसार आठवडे बाज...
देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव)
कोरोना संकटामुळे गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून बंद असलेला देवळाली प्रवरा येथील शासनाच्या नियमानुसार आठवडे बाजार उद्या शनिवार दि.२४ ऑक्टोबर रोजी भरला जाणार असून ठराविक अंतरावर शेतकरी- व्यापारी यांना बसविले जाणार असून मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अजित निकत यांनी दिली.
कोरोनामुळे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले होते.जवळपास मार्च महिन्यापासून राज्यातील सर्व आठवडे बाजार बंद होते. सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन आठवडे बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे उद्या शनिवार २४ ऑक्टोबर पासून देवळाली प्रवरा येथील आठवडे बाजार भरणार असल्याचे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले. शेतकरी व व्यापारी हे ठराविक अंतर ठेवून आपला माल विक्री करण्यास बसतील यादृष्टीने काळजी घेतली जाणार आहे. मास्क न वापरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांचे पथकही नियुक्त केले असल्याचे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले.
दरम्यान रविवारी विजयादशमी असल्याने उद्याच्या बाजारात खरेदीसाठी नागरिकांची व विक्रेत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. नगर पालिकेच्या वतीने सर्व उपाय योजना तयारीत ठेवल्या आहेत.बाजार म्हटल्यावर गर्दी होणारच तरीही नागरीकांनी स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे निकत यांनी सांगितले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत