राहूरी(राजेंद्र उंडे) राज्याच्या राजकारणात दिवाळीपुर्वीच फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचे एकनिष्ठ व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यां...
राहूरी(राजेंद्र उंडे)नगरच राजकारण हे नेहमीच ‘सोधा’ चे राहिले आहे. राजकारणाच्या या सारीपाटावर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे एक मोठे नाव आहे. तगडा अनुभव, काम करण्याची तत्परता, कार्यकर्त्यांचा मोठा समूह आणि सर्वच पक्षात त्यांना मिळणारी आदराची वागणूक हीच त्यांच्या राजकीय वर्चस्वाची पावती समजली जाते. खरंतर, कर्डिलेंचे सर्वच पक्षात सोयरे-धायरे पेरलेले आहेत. त्यामुळेच जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून त्यांना ओळखले जाते.
राज्याच्या राजकारणात दिवाळीपुर्वीच फटाके फुटण्यास सुरूवात झाली आहे. भाजपाचे एकनिष्ठ व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला राम राम ठोकून मोठा राजकीय बॉम्ब फोडला आहे. आता खडसेंसोबत काही विद्यमान आमदार व माजी आमदारही राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे नावही चांगलेच चर्चेत आहे. कर्डिलेंकडून याबाबत तसा कोणताही दुजोरा नसला तरी विधानपरिषदेची नगरची जागा मिळालीच तर कर्डिले हे नक्कीच दसर्याला ‘सिमोल्लंघनं’ करण्याचा विचार करू शकतात, असेही राजकीय विश्लेषकातून बोलले जात आहे
राजकारणात आजचा शत्रू हा उद्याचा मित्र असू शकतो, हे समीकरण आहे, त्यामुळे येथे काय आणि कधी घडेल हे कुणीही सांगू शकत नाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, किंवा राष्ट्रवादीला आपला नंबर एकच शत्रू समजणारे नाथाभाऊ आज कुठे चालले, हे पाहून नक्कीच समजते, त्यामुळे येथे फकत बेरजेचे आणि बेकीचे राजकारण खेळले जाते, हे स्पष्ट आहेनेवासा मतदार संघात दिग्गजांसह गडाखांना देखील चितपट केल्यानंतर राहुरीतही त्यांनी तनपुरेंना दहा वर्षे घरी बसवले. अर्थात, ही त्यांची घोडदौर अपक्ष, राष्ट्रवादी आणि नंतर भाजप पक्षातून झाल्याचेही नाकारून चालणार नाही. सांगायचे एवढेच की, कर्डिले हे सर्वप्रथम ‘राष्ट्रवादी’च्या आश्रयाला गेले होते. मतदार संघाचे विभाजन झाले, त्यानंतर मात्र त्यांची गोची झाली. कारण राहुरीत तनपुरे अगोदरच अंगाला तेल लावून तयार होते. तर नेवासाही गडाखांनी आता काबीजच केला होता. त्यामुळे लोकसभा लढविण्याचा पर्याय समोर आला. त्यातून ते लोकसभा देखील ते शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडूनच लढले. तनपुरेंनी राहुरीतून कर्डिलेंना आघाडी देवूनही दुर्दैवाने भाजपाच्या दिलीप गांधींनी त्यांचा पराभव केला होता. या पराभवामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व संपल्यागत झाले होते. मात्र, विधानसभेला राहुरीतून राष्ट्रवादीचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या विरोधात माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच कर्डिलेंनी भाजपाच्या गोटात शिरकाव केला. त्यासाठी तत्कालिन ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांना राजकीय गुरू बनून टाकले. तसेच भाजपाची उमेदवारी फायनल झालेल्या चंद्रशेखर कदम यांचेही मन जिंकले आणि राहुरीतून भाजपाची उमेदवारी स्वतःला मिळवली. त्यानंतर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत कर्डिले राहुरीचे आमदार झाले. दोन पंचवार्षिक तनपुरे घराण्याला पराभूत केल्यानंतर गेल्यावेळी मात्र प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचा पराभव केल्याने आता पुन्हा त्यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. अर्थात या निवडणुकीपुर्वी जिल्हा भाजपात कर्डिलेंचा दबदबा होता. भाजपाच्या वरच्या फळीतील लोकांमध्येही त्यांच्या शब्दाला किंमत होती. मात्र विखेंचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर राजकीय समिकरणे फिरली होती. त्यातून विधानसभेत नेमकं काय घडलं ? हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतीष्याची गरज वाटत नाही.
असो, आता भाजपामध्ये काही नेत्यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांच्याकडून आश्रय शोधला जात आहे. दोन दिवसांपुर्वीच खडसेंनी ही खदखद बाहेर आणली आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी त्यांचे मोठे स्वागत केले आहे. अशाप्रकारे राष्ट्रवादीही भाजपातून येणार्या ‘पाहुण्यांच्या’ स्वागतासाठी उत्सुक आहे. आता कर्डिलेंनीही ठरवलं तर त्यांना राष्ट्रवादीही नक्कीच नाही म्हणणार नाहीत. कारण कर्डिलेंसारखा नेता पक्षात आल्यानंतर जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात यावे, यासाठी तसा तर फार दिवसांपुर्वीचा आग्रह आहे. मात्र जावई संग्राम जगताप यांना त्यात यश आले नव्हते. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. विधान परिषदेची आमदार अरूणकाका जगताप यांची जागा रिक्त होणार आहे. विधानपरिषदेच्या मतांची बेरीज पाहता येथेही महाविकास आघाडीचे पारडे तगडे आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी त्यांचे जिल्हा बँकेतून दृढ संबध आहेत., राष्ट्रवादीतून कर्डिले विधानपरिषदेवर गेले तर तनपुरेंचा मार्गही मोकळाच..! त्यामुळे विधानपरिषद सोपी जाऊ शकते, याात तिळमात्र शंका नाही. शिवसेनाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर आहे, शिवाय नगरची शिवसेना कोण चालवतंय ? हे देखील उघडपणे सांगायची गरज वाटत नाही. त्यामुळे आपल्या राजकीय सोयीसाठी आता कर्डिले देखील दिवाळीच्या मुहूर्तावर विधानपरिषदेतून आमदारकी मिळत असेल, तर याचा नक्कीच विचार करतील. अर्थात, पवार साहेबांनी शब्द दिलाचं तरचं कर्डिले हे राष्ट्रवादीत जाण्याचे धाडस करतील, तसं भाजपात असले तरी राष्ट्रवादीच्या (नगरच्या) जडणघडणीत त्यांचे असलेले योगदान पवार साहेबही नाकारणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी राष्ट्रवादी पायघड्या टाकणार हे नक्कीच.. फक्त आता कर्डिले ही ऑफर आलीचं तर काय भूमिका घेणार ? याकडेच जिल्हयाचे लक्ष आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत