राहुरी फॅक्टरीतील गुटखा व्यापाऱ्याच्या दुकानाची तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडून झाडाझडती - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील गुटखा व्यापाऱ्याच्या दुकानाची तहसीलदार व पोलीस निरीक्षकांकडून झाडाझडती

 राहुरी फॅक्टरी (वेब टिम) -  राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड नजीक असलेल्या भंडारी नामक किराणा दुकानदारा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्य...

 राहुरी फॅक्टरी (वेब टिम) - 

राहुरी फॅक्टरी येथील बस स्टँड नजीक असलेल्या भंडारी नामक किराणा दुकानदारा मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री करत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केल्या नंतर तातडीने तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी सदर गुटखा व्यापाऱ्याच्या दुकानाची झाडाझडती केली.परंतु त्या व्यापाऱ्याने गुटखा दुसऱ्या ठिकाणी लपून ठेवल्याने पोलिसांना रिकाम्या हाताने परतावे  लागल्याची चर्चा नागरिकांत सुरू होती.त्यामुळे पोलीस व महसूल अधिकारी यांना भंडारी व्यापारी भारी भरल्याचे जनतेतून बोलले जात आहे.

   गेल्या चार दिवसापूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरातील सामाजिक संघटनांनी खुले आम गुटखा विक्री करणाऱ्या राहुरी फॅक्टरी येथील पोपट कांतीलाल भंडारी याच्यावर त्वरित कारवाई केली नाहीतर पोलीस निरीक्षकांना गुटख्याचा हार घालून राहुरी पोलीस ठाण्यासमोर गुटखा व सुगंधी तंबाखूची होळी करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.

दरम्यान आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहसीलदार फसीयोद्दीन शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी पोपट भंडारीच्या वंदना प्रोव्हिजन स्टोअर्स या दुकानात फौजफाट्यासह येऊन व्यापाऱ्या दुकानाची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना गुटखा मिळून न आल्याने खाली हात जावे लागले.



गुटखा लपवून ठेवल्याची चर्चा..

गुटखाबाबत सामाजिक संघटनांनी निवेदन दिल्यानंतर भंडारी व्यापाऱ्याला स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी आमचे वरिष्ठ कधीही छापा टाकू शकतात त्यामुळे काळजी घ्या असा सल्ला दिल्याने पोपट भंडारी याने सर्व गुटखा दुसऱ्या ठिकाणी नेऊन दडविला असल्याची चर्चा राहुरी फॅक्टरी परीसरात सुरू होती. 



भंडारीची हुशारी नेहमी यशस्वी

  गुटख्याचा होलसेल व्यापारी म्हणून पोपट भंडारी सर्वदूर परिचित आहे. अनेक वेळा त्याच्यावर अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांचे छापे झाले.परंतु या  छाप्यात अधिकाऱ्यांना गुटखा कधीही हाती लागला नाही.  भंडारीने  कराळेवाडी, सुर्यानगर, ताहाराबाद रोड यासह अनेक ठिकाणी गुटखा दडवून ठेवण्यासाठी ठेपे करून ठेवले आहेत. त्यामुळे  बस स्टँड वरील दुकानात कधीही गुटखा माल अधिकाऱ्यांना सापडत नाही.त्यामुळे भंडारीची हुशारी नेहमी यशस्वी ठरत असल्याची जोरदार चर्चा फॅक्टरी परिसरात सुरू होती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत