देवळाली प्रवरातील स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीबाबत माहिती घेऊन कार्यवाही- मनोज पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरातील स्वतंत्र पोलीस स्टेशन निर्मितीबाबत माहिती घेऊन कार्यवाही- मनोज पाटील

  देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव) देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर कसे कार्यान्वित क...

 देवळाली प्रवरा(श्रीकांत जाधव)

देवळाली प्रवरा येथे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मीतीबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर कसे कार्यान्वित करण्यात येईल निश्चित प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अहमदनगरचे जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी केले.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांचा आढावा घेण्यासाठी पोलिस प्रमुखांचा दौरा सुरु असताना दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राहुरी पोलिस ठाण्याला जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी भेट दिली. 


      राहुरी पोलिस ठाण्या अंतर्गत गुन्हेगारीचा आढावा घेत पोलिस ठाण्यातील संपूर्ण माहीती घेवून येथील कारागृह, कैदी, तसेच पोलिस अंमलदार कक्षात जावून तपासणी केली. यावेळी त्यांचे सोबत श्रीरामपुर विभागीय अप्पर पोलिस अधिक्षक डाॅ. दिपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिक्षक राहुल मदने, पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख उपस्थित होते. राहुरी पोलिस ठाण्याची तपासणी व अधिकारी यांचेशी चर्चा केल्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुख मनोज पाटील यांनी उपस्थित पत्रकारांशी वार्तालाप करत नगर जिल्ह्यातील व तालुक्याच्या गुन्हेगारी विषयी संवाद साधला. आपल्याकडे असलेल्या सुचनांचा विचार करुन त्यावर तत्पर कार्यवाही करण्याचे सुचोवात करत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. प्राधान्याने वाळू तस्करीचा बिमोड करु. तसेच गुन्हेगारीचे वर्गीकरण करण्यात येवून यावर मार्ग काढला जाईल. यावेळी पत्रकारांनी केलेल्या सुचना व त्यावर उपाय केला जाईल असे आश्वासित पाटील यांनी केले. यावेळी पत्रकारांनी राहुरी तालुक्यात देवळाली प्रवरा पोलिस ठाण्याचा प्रश्न कधी मार्गी लावला जाईल, असे विचारले असता याविषयी सविस्तर माहीती घेवून याबाबत आवश्यक ती कार्यवाही करु असे सांगितले.


जिल्हा पोलिस प्रमुखांच्या दौऱ्यावेळी आयपीएस अधिकारी श्रीरामपूर शहर आयुष नोपाणि, श्रीरामपूर तालूका येथील पोलिस निरीक्षक मकसुद खान, श्रीरामपूर शहर सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान पाटील, संभाजी पाटील, श्रीरामपूर तालूका सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन शिंदे, श्रीरामपूर येथील उप पोलिस निरीक्षक संतोष बहाकर, समाधान सुरवाडे, राहुरी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन बागुल, उपनिरिक्षक निरज बोकील उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत